Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

सहकार भारती जिल्हाध्यक्षपदी श्रीहर्षगौडा पाटील

Responsive Ad Here



सहकार भारती जिल्हाध्यक्षपदी श्रीहर्षगौडा पाटील , संघटना कार्यवाह दिपक शिंत्रे, कार्यवाह चिंचली यांची निवड, मान्यवरांच्या उपस्थितीत  २५ जुलै रोजी पदग्रहण 






विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

सहकार भारती कर्नाटक नूतन विजयपूर जिल्हाध्यक्ष श्रीहर्षगौडा पाटील, संघटना कार्यवाह दिपक शिंत्रे, मुख्य कार्यवाह परशुराम चिंचली यांच्या सह जिल्हा कार्यकारिणी सदस्य, तालुका अध्यक्ष व पदाधिकारी महिला प्रमुख व विविध प्रकोष्ट पदाधिकारांचा पदग्रहण समारंभ दि २५ जुलै शुक्रवार रोजी शहरातील भावसार सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात आले असल्याचे बेळगांव विभाग कार्यवाह सुभाष इंडी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

   या समारंभाचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री व खासदार रमेश जिगजिनगी यांच्या हस्ते करण्यात येणार असून प्रमुख पाहुणे म्हणून सहकार भारतीचे राष्ट्रीय संरक्षक रमेश वैद्यजी,  राज्य अध्यक्ष प्रभूदेव मागणूर, राज्य मुख्य कार्यवाह नरसिंह कामत, माजी आमदार अरुण शाहपूर,  निवृत्त अप्पर निबंधक एम.जी.पाटील, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष राजशेखर गुडदिन्नी,  श्री सिद्धेश्वर बॅकेचे अध्यक्ष विजयकुमार इजेरी,  शांतेश्वेर सहकारी संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत इंडी,  भाजपाचे बेळगांव विभाग प्रभारी चंद्रशेखर कवटगी, माजी उपमहापौर राजेश देवगिरी हे उपस्थित राहणार आहेत तर सहकार भारती माजी अध्यक्ष डॉ आर.आर. नाईक यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभात श्री बसव वचन साहित्याचा इंग्रजी भाषेत अनुवाद केलेला ग्रंथकार अप्पर पोलीस अधीक्षक बसवराज यलगार यांच्या विशेष सन्मान करण्यात येणार आहे.