Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

अक्कलकोट तालुक्यात पोलिसांच्या दुर्लक्षात अवैध धंदे जोमात

Responsive Ad Here

 अक्कलकोट तालुक्यात पोलिसांच्या दुर्लक्षात अवैध धंदे जोमात 






अक्कलकोट- तालुक्यातील पोलिसांच्या दुर्लक्षात अक्कलकोट, दुधनी, तोळणुर, व नागणसुर येथे अवैध धंदे जोमात चालु आहे. 

      कमी गुंतवणुकीत जास्त नफा या मानसिकतेमुळे अनेकांची  कौल अवैध धंदे कडे कौल वाढला आहे. त्याचाच फायदा घेत तालुक्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे. अशा अवैध धंदेकडे वाढलेला कल आणि पोलिस विभागाकडून त्याकडे करण्यात आलेला दुर्लक्ष यामुळे जणु अवैध धंद्याला मोकळे रानच मिळाला आहे. 

     दहावी- बारावी नंतर तरुण पिढी कमी गुंतवणुकीचा व्यवसाय म्हणून पानटपरी, दारु विक्री, जुगार, मटका अशा अवैध धंद्याकडे कल वाढल्याचे दिसून येत आहे.

      मटक्यात दहा रुपये मध्ये नऊशे रुपये मिळवता येते, क्रमांकाच्या अंदाजावर आकडेमोड करुन सट्ट्याचे गणित मांडले जात आहे, मात्र या नादात पैसा मिळवण्यापेक्षा गमवण्याची संख्या वाढत आहे आणि त्यातुनच कर्जबाजारीपणा आणि नशेच्या आहारी जाणारे तरुण अनपेक्षितपणे गुन्हेगारी कडे वळत आहे. 

    अक्कलकोट तालुक्यातील दुधनी, नागणसुर, तोळणुर, अक्कलकोट स्टेशन या पोलिस स्टेशन ठाण्याच्या हद्दीत खुलेआम अवैध धंदे सुरु असताना देखील पोलिस ठाण्याकडुन त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे दिसून येते येत आहे.