Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

तालुका बरोबर दुधनीही अवैद्य धंद्यात अव्वल!

Responsive Ad Here

 दुधनीतील काही अवैध  धंदे का बंद होईना?


तालुका बरोबर दुधनीही  अवैद्य धंद्यात अव्वल!




अक्कलकोट/ प्रतिनिधी 


तालुक्यातील दुधनी शहर  अवैध धंदे साठी अव्वल असल्याचे चित्र स्पष्ट आहे. दुधनी शहरात  मटका, जुगार, अवैध दारु विक्री,रेशन तांदुळ विक्री  असे अनेक  अवैध  धंदे चालू आहेत. 

      दुधनीतील व तालुक्यातील अवैध धंदे बाबत बातम्या लावली असता गाव गुंडानी आमच्या प्रतिनिधीशी किंवा संपादक बरोबर जिवे मारण्याची धमकी सुध्दा दिले जाते  तरी सोलापूर 24तास न्युज चॅनेल अवैद्य धंदे बाबत ठामपणे काम करत आहे. पण अक्कलकोट तालुक्यातील  अवैध धंदे  बंद करण्यास पोलिस प्रशासन  अपयशी ठरत आहे.

   आ.सचिन कल्याणशेट्टी यांनी दुधनी व तालुक्यातील अवैध धंदे बंद करावे अशी विनंती सोलापूर 24तास न्युज चॅनेल च्या संपादक व अक्कलकोट तालुक्यातील  जनतेकडून  अनेकवेळा विनंती केली आहे.

  पण आ.कल्याणशेट्टी यांनी दुधनी व तालुकातील अवैध धंदे बद्दल दुर्लक्ष करीत आहेत असे लोकांना वाटत आहे .


तालुक्यात सध्या अक्कलकोट, तोळणुर,दुधनी,  नागणसुर, हैद्रा सारख्या गावात अवैध धंदे  जोरदार चालू असल्याचे चर्चा सुरु आहे.