ज्येष्ठ नागरिकांच्या विविध स्पर्धानचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न
मुंबई/ प्रतिनिधी - सुरेश पोटे
फेस्कॉम मुंबई प्रादेशिक विभागाने सन २०२४- २५ मध्ये आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा संध्याकाळी ४ वाजता, गणेश हाॅल, ज्येष्ठ नागरिक भवन नेरूळ पश्चिम येथे अतिशय उत्साहात व आनंदात पार पडला. अभिमानाने उल्लेख करावा अशा सळसळत्या उत्साहाने व जोमाने ज्येष्ठ नागरिक या स्पर्धांमधे भाग घेतात. तरूणाईला लाजवेल असा त्यांचा उत्साह असतो.
कार्यक्रमाचे अध्यक्ष होते डाॅ. श्री. आण्णासाहेब टेकाळे, अध्यक्ष महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ ( फेस्कॉम). विशेष पाहुणे होते श्री. टी पी आर उन्नी, अध्यक्ष, अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक महासंघ.
कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुंबई शहर व उपनगरातील संलग्न संघाचे सदस्य मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात फेस्कॉम च्या प्रार्थनेने व दीप प्रज्वलन करून झाली.
फेस्कॉम, मुंबई प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष श्री. सुरेश पोटे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात झालेल्या 13 स्पर्धांचा आढावा घेतला. स्पर्धांना मिळालेल्या उदंड प्रतिसादाबद्दल स्पर्धकांचे आभार मानले. "आनंद घ्या व आनंद दया!" पुढेही मुंबई प्रादेशिक विभागाच्या यशस्वी वाटचालीत साथ देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष, फेस्कॉम चे झुंजार नेतै
डाॅ. आण्णासाहेब टेकाळे यांचे भाषण नेहमीच प्रेरणादायी असते. विविध योजनांची माहिती देत त्यांनी ज्येष्ठांची कोरोना काळात रद्द केलेली सवलत पुन्हा सुरू करावी या साठी महासंघ प्रयत्नशील असल्याचे सांगितले. या कामात सर्व ज्येष्ठांना सहकार्य करण्याचे आवाहन केले .
सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले व पुढे होणाऱ्या स्पर्धांसाठी शुभेच्छा देऊन समारोप केला.
आइस्काॅन अध्यक्ष टि पी आर उन्नी यांनी आपल्या भाषणात परत रेल्वे सवलती वर भर दिला व सहकार्य करण्याचे आवाहन केले. विजेत्यांचे अभिनंदन करत त्यांच्या अमाप उत्साहाचे कौतुक केले.
श्री. विजय औंधे यांनी अगदी मोजक्या शब्दात उपस्थितांना मार्गदर्शन केले.
मे २०२५ मध्ये *Aging with dignity* या विषयावर महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्यासह चर्चासत्रा साठी भारतातील सर्व राज्यांमधून काही प्रतिनिधी आमंत्रित केले होते. तो बहुमान फेस्कॉम मुंबई प्रादेशिक विभागाच्या उपाध्यक्ष डाॅ.रेखाताई भातखंडे यांना लाभला. याप्रित्यर्थ त्यांचा शाल ,पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाचे श्री. उत्तम माने यांना कोलंबो येथे ज्येष्ठ नागरिकां साठी झालेल्या ॲथलेटिक्स स्पर्धा *लांब उडी* मधे कास्य पदक मिळाल्याबद्दल बद्दल सत्कार करण्यात आला. आतापर्यंत श्री माने यांना
४७ सुवर्ण, ५४ रौप्य, आणि ३१ कास्य अशी एकूण १३२ पदके मिळाली आहेत.
त्यांचा शाल ,पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यानंतर श्री.अंकुश जांभळे, सेक्रेटरी फायनान्स, आइस्काॅन यांना त्यांच्या अनमोल समाजसेवे बद्दल सन २०२५ मध्ये मानद डाॅक्टरेट मिळाल्याबद्दल त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.सन्मान पत्राचे वाचन सौ प्रतिभाताई सराफ यांनी केले.
यानंतर पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला. फेस्कॉम व आइस्काॅन चे अध्यक्ष यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली.विजेत्यांना त्या स्पर्धेस अनुरूप ट्राॅफी. त्यामुळे विजेत्यांचा आनंद द्विगुणित झाला होता.
अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात हा सोहळा संपन्न झाला.
आभार प्रदर्शन फेस्कॉम मुंबई प्रादेशिक विभाग, सचिव श्री मुकुंद फडतरे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फेस्कॉम मुंबई प्रादेशिक विभागाच्या संघटक सचिव सौ स्वाती फडके यांनी. त्यांना साथ दिली कार्यकारिणी सदस्या सौ.लता पोवार यांनी.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे पाहुण्यांचे स्वागत फुलांचे गुच्छ न देता पर्यावरण स्नेही असे टाॅवेल नॅपकिन ने बनवलेले गुच्छ दिले.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने व अल्पोपाहार ने झाली.