Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

सोनार समाजाच्या मागण्या बाबत सकारात्मक निर्णय घेऊ - एकनाथ शिंदे

Responsive Ad Here

 सोनार समाजाच्या मागण्या बाबत सकारात्मक निर्णय घेऊ  -  एकनाथ शिंदे 






अक्कलकोट/ प्रतिनिधी 

  जिल्हा सोनार समाजाच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांना अक्कलकोट च्या एका कार्यक्रमाच्या प्रसंगी सोनार समाजाच्या प्रलंबित मागण्याचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वेदपाठक यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले, निवेदन स्वीकारून *सोनार समाजाच्या मागण्या बाबत सकारात्मक निर्णय घेऊ* असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले. 

     माजी गृहराज्यमंत्री सिद्दाराम म्हेत्रे यांचा शिवसेना पक्ष प्रवेश निमित्य नामदार शिंदे अक्कलकोटला आले होते. एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी सोनार समाजासाठी  *सोनार आर्थिक विकास महामंडळ* स्थापन करून मोठा निर्णय घेतला होता त्याबद्दल समाजाच्या वतीने  नामदार शिंदे यांचा चंद्रकांत वेदपाठक यांनी आभार मानले.

    मंजूर सोनार आर्थिक विकास महामंडळास *श्री संत शिरोमणी नरहरी आर्थिक विकास महामंडळ* असे नामकरण करावेत व प्रत्येक जिल्हातील कार्यालय उघडावेत आणि तातडीने 100 कोटी रुपये महामंडळास देण्यात यावे,  राज्यात सोनार समाजाकरिता प्रत्येक तालुका व प्रत्येक जिल्ह्यात *गृहनिर्माण संस्थेला मोफत किंवा अल्प दरात शासकीय जमीन* देण्यात यावे, नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकीत *राजकीय पटलावर योग्य प्रतिनिधित्व* मिळावे आणि विविध महामंडळात योग्य स्थान मिळावेत, सोलापूरच्या अहिल्याबाई होळकर विद्यापीठात *श्री संत शिरोमणी नरहरी अभ्यासन केंद्रास त्वरित मंजुरी* देण्यात यावे, मुंबई रेल्वे स्टेशनला *नामदार नाना शंकरशेठ  मुंबई रेल्वे टर्मिनल असे नामकरण* करावे व त्यांना *भारतरत्न* देण्यात यावे, सोनारांना होणारा पोलिसांचा त्रास कमी करून *फौंजदारी सहिंता कलम 411 मध्ये दुरुस्ती करून चोरीच्या केसेस मध्ये सोनारांना जागेवरच जामीन मिळावा* अशी तरतूद करावे, राज्यातील प्राथमिक व माध्यमिक प्रशालेत गेल्या 15 वर्षांपासून प्रलंबित *कला शिक्षकांच्या जागेचे त्वरित जाहिरात देऊन कला शिक्षकांची भरती करावी* अश्या अनेक मागण्याचे निवेदन उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांना देण्यात आले. 

     याबाबत नामदार शिंदे यांनी *सोनार समाजाच्या मागण्या बाबत सकारात्मक निर्णय घेऊ* असे  आश्वासन शिष्ठमंडळास दिले. यावेळी श्री संत शिरोमणी नरहरी प्रतिष्ठान जिल्हा सोलापूर चे संस्थापक चंद्रकांत वेदपाठक, विद्यमान अध्यक्ष दिपक पोतदार, सेक्रेटरी सचिन निंबाळकर, अक्कलकोट सुवर्णकार संघांचे अध्यक्ष अनिल वेदपाठक, जिल्हा सोनार हक्क परिषदेचे माजी समन्वयक व सहकार भारतीचे सुनील पंडित, स्वामिनाथ पोतदार आदी  उपस्थित होते.