Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

घर कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू; थोडक्यात बचावले पती आणि मुले

Responsive Ad Here

 घर कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू; थोडक्यात बचावले पती आणि मुले






विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

 विजयपूर जिल्ह्यात काल रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्हाभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे  जिल्ह्यातील तिकोटा तालुक्यातील बाबानगर या गावात घर कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. घराची छप्पर कोसळल्यामुळे घरात झोपलेली महिला जागीच मरण पावली. संगीता बाळासाहेब पाटील (वय 30) असे मयत महिलेचे नाव आहे. ही घटना काल उशिरा रात्री घडली.

पावसामुळे घर गळत असल्याचे लक्षात येताच पती आणि मुले बाहेर पडले आणि थोडक्यात बचावले. मात्र संगीता झोपेतच असल्यामुळे तिच्यावर छप्पर कोसळले आणि तिचा मृत्यू झाला. मृतदेह बाहेर काढण्यासाठी फार प्रयत्न करावे लागले. या घटनेची नोंद तिकोटा पोलीस ठाण्यात झाली आहे.