एमजीए फाँडेशन आयोजित
इनडोअर क्रिकेट स्पर्धेत ऑडिट आर्मीस वि रिटर्न मेकर्स अंतिम फेरीत लढणार
मुंबई क्रिडा प्रतिनिधी/ बाळ तोरसकर
मुंबई : एमजीए फाउंडेशनतर्फे मुंबई इनडोअर क्रिकेट स्पोर्ट्स असोसिएशन आणि महाइनडोअर क्रिकेट असोसिएशन यांच्या मान्यतेने भव्य इनडोअर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा गोरेगाव (पश्चिम) येथील राम मंदिर रेल्वे स्थानकाजवळील सन्टेक टर्फ येथे खेळली जात आहे.
या स्पर्धेतील पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑडिट आर्मीस संघाने लीगल लेजर्स संघावर ८१-६८ असा १३ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात ऑडिट आर्मीजने ८१ धावा करून विजय मिळवत अंतिम फेरीत स्थान मिळवले. ऑडिट आर्मीच्या शिवने २५ धावा करून संघाला विजय मिळवून दिला. त्याला उत्कृष्ट साथ देताना मोहित ने २३ धावा तर राहुल ने १३ धावा करून विजयात मुलाचा वाटा उचलला. ऑडिट आर्मीच्या विनयने २ खेळाडू बाद केले तर मोहित व शिवने प्रत्येकी एक खेळाडू बाद केला. तर लीगल लेजर्सच्या सागर अय्यरने २० धावा केल्या त्याला निखिलने उत्कृष्ट साथ देत १६ धावा केल्या तर मंथनने १२ भावा करून संघाला ६८ धावा पर्यंत पोहोचवले पण समजायला ते विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले. निघालेजर्सच्या प्रथमने दोन खेळाडू बाद केले तर निखिलने एक खेळाडू बाद केला.
दुसरे उपांत्य फेरीच्या सामन्यात रिटर्न्स मेकर्सने टीडीएस किंग्सचा ८१-७२ असा नऊ धावांनी विजय संपादन केला. या सामन्यात रिटर्न मेकर्सच्या परिमल (२१ धावा), गौरव (१७ भावा), हितेन (१२ धावा) यांनी संघाला विजय पथावर घेऊन गेले व अंतिम फेरीत धडक मारली. टीडीएस किंग च्या ऋषभ, इरफान व संदीपने प्रत्येकी एक खेळाडू बाद केले. तर पराभूत टीडीएस किंग्सच्या राम (१४ धावा), स्वप्निल शिंदे (१५ धावा) व सौमीन (१३ धावा) यांनी दिलेली कडवी लढत अपयशी ठरली. रिटन मेकर च्याच्या सुरेश नाईक व गौरव अय्यरने प्रत्येकी एक खेळाडू बात करण्यात यश मिळवले.
