सालोटगी गावात अचानक लागलेल्या आगीत मोठे नुकसान
विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
इंडी तालुक्यातील सालोटगी गावात एका घराला अचानक आग लागून १२ मेंढ्या, १ ट्रॅक्टर, द्राक्षाच्या शेतीसाठी लागणारी औषधे आणि धान्य जळून खाक झाले असून या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
सकाळी ७ वाजता सालोटगी गावातील अप्पण्णा सोमन्णा दोड्डी यांच्या घराला अचानक आग लागली. या आगीत त्यांचे संपूर्ण घर जळून खाक झाले.
घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस आणि पशुवैद्यकीय विभागाचे अधिकारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
ही घटना एका गरीब शेतकऱ्याच्या बाबतीत घडली असून त्यांनी कर्ज काढून ट्रॅक्टर खरेदी केला होता. या शेतकऱ्याला रु 20 लाखांचे नुकसान झाले आहे शासनाने त्या शेतकऱ्याला आर्थिक मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
