Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडेची दहावीच्या शंभर टक्के निकालाची परंपरा अबाधीत

Responsive Ad Here

 दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडेची दहावीच्या शंभर टक्के निकालाची परंपरा अबाधीत






रत्नागिरी/ प्रतिनिधी 

सैतवडे केंद्रातही मॉडेलची कु. तन्वी बळकटे प्रथम


मुस्लिम एज्युकेशन सोसायटी सैतवडे संचलित दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल 100% लागला आहे. या प्रशालेने गेली अनेक वर्षे शंकर टक्के निकालाची परंपरा अबाधित राखली आहे.या विद्यालयातील 

तन्वी बळकटे हिने प्रशालेत व केंद्रात प्रथम 87.40% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच द्वितीय क्रमांक रिया पावसकर  81.60 % व  सागर केसरकर 81.40 % गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला.विद्यालयात संख्यात्मक व गुणात्मक दर्जेदार निकाल लागताच सर्व संस्था पदाधिकारी, तसेच मुख्याध्यापक श्री विलासराव कोळेकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले.