Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

अकलकोट येथे शानदार सोहळ्यात राज्यस्तरीय 111 समाजसेवक समाज भुषण पुरस्काराने सन्मानित!

Responsive Ad Here



                            

अकलकोट येथे शानदार सोहळ्यात राज्यस्तरीय 111 समाजसेवक समाज भुषण  पुरस्काराने सन्मानित






अक्कलकोट/ प्रतिनिधी 

अक्कलकोट दि. 19:-- महाराष्ट्रात विविध क्षेत्रात विविध समाजसेवकांनी केलेल्या लक्षवेधी कार्याबद्दल 111 सुवर्णरत्नांचा महावस्त्र, मोत्याचे माळ, सन्मान पत्र, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते एका शानदार सोहळ्यात सन्मान व सत्कार करण्यात आले.

     बाळासाहेबांची शिवसेनाअक्कलकोट, सोनार हक्क परिषद जिल्हा सोलापूर व स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना तालुका अक्कलकोट यांच्या संयुक्त विध्यमाने, आयोजक / संयोजक चंद्रकांत दादा वेदपाठक व संपूर्ण वेदपाठक परिवार यांनी  अक्कलकोट येथील सर्जेराव जाधव सभागृहात आयोजित करण्यात केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वराज्य चे प्रदेश अध्यक्षा सौ. धनश्री उत्पात पंढरपूर ह्या होत्या.

   या सोहळ्याचे उदघाटन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनिष काळजे होते तर प्रमुख वक्ते म्हणून सोनार हक्क परिषदेचे संस्थापक राजेशभाऊ पंडित रेणापूरकर होते.

   अक्कलकोट शहर,  सोलापूर जिल्ह्यासह 18 जिल्ह्यातील विविध जातीधर्मातील 111 समाजसेवकांचा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.



     प्रथम श्री संत नरहरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिपक पोतदार यांनी स्वागत केले, तर प्रस्तावना कार्यक्रमाचे संयोजक चंद्रकांत दादा वेदपाठक यांनी केले.         

     कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय देशमुख, जिल्हा महिला आघाडी प्रमुख सौ. अनिता माळगे, जिल्हा उपप्रमुख सौ. सुलोचना कडबगावकर,विधानसभा संघटक प्रा. सूर्यकांत कडबगांवकर, स्वराज्य चे विश्वस्त उमेश काशीकर,पश्चिम महा. अध्यक्ष श्रीराम बडवे, सौ. शोभा खेडकर, इफ्तेकार कामतीकर, सोनार हक्क परिषदेचे राज्य युवा समन्वयक निलेशभैय्या धाराशिवकर, कुर्डुवाडीचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र पारखे, सहकार भारतीचे सुनील पंडित, सोलापूरचे संतोष दीक्षित, पुण्याचे गणेश क्षीरसागर हे होते.

    कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विठ्ठल वेदपाठक, सुरेश वेदपाठक, अनिल वेदपाठक,गुरुनाथ पोतदार सर,कल्लप्पा खेडगी, सचिन निंबाळकर, अनिल पवार,राहूल वेदपाठक, आकाश वेदपाठक,सागर वेदपाठक, ओंकार वेदपाठक, स्वामिनाथ हरवाळकर, आदींनी विशेष परिश्रम घेतले.