Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

चंद्रकांत वेदपाठक यांना "श्री संत शिरोमणी नरहरी राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित!

Responsive Ad Here

  चंद्रकांत वेदपाठक यांना  "श्री संत शिरोमणी नरहरी राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित!






अक्कलकोट / प्रतिनिधी 

   अक्कलकोटचे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत रामचंद्र वेदपाठक यांना अखिल सोनार समाज प्रतिष्ठान अंबाजोगाई च्या वतीने दिला जाणारा प्रतिष्टीत " श्री संत शिरोमणी नरहरी राज्यस्तरीय पुरस्कार " प्रतिष्ठानचे संस्थापक राजेशभाऊ  पंडित रेणापूरकर व मान्यवरांच्या  हस्ते सन्मान पत्र, सन्मान चिन्ह देऊन पुष्पहार घालून सत्कार करून प्रदान करण्यात आला.

     पंढरपूर येथे  सोनार समाजाच्या मेळाव्यात चंद्रकांत वेदपाठक यांना सन्मानित करण्यात आले. गेल्या 40 वर्षांपासून वेदपाठक यांनी सोनार समाजातील गरजू लोकांकरिता विशेष असे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांचे कौतुक करून त्यांचा सत्कार करण्यात आला.

   चंद्रकांत वेदपाठक यांना श्री संत शिरोमणी नरहरी राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्या बद्दल आमदार सचिन कल्याणशेट्टी, शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख महेश साठे, तालुका प्रमुख संजय देशमुख, तालुका संघटक सूर्यकांत कडबगांवकर,आंतरराष्ट्रीय लायन्स चे माजी प्रांतपाल राजशेखर कापसे, लायन्स क्लबचे अध्यक्ष शिवानंद नंदर्गी, लायन्स प्राथमिक शाळेचे अध्यक्ष राजेंद्र हत्ते सोलापूर चे प्रा. राजन दीक्षित, सुनील पंडित, स्वराज्य पंढरपूरचे सौ. धनश्री उत्पात, उमेश काशीकर, दिनेश काटकर, आदी मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.