श्रीगुरु जयवंत महाराज बोधले यांची प्रवचने मालेचा शुभारंभ
विजयपुर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
सोलापूर-
सदगुरू बोधराज सेवा प्रतिष्ठान आयोजित, संत माणकोजी महाराज बोधले यांचे विद्यमान वंशज,श्रीगुरु,श्री,जयवंत महाराज बोधले यांची तीन दिवसीय प्रवचन माला कर्मयोग या विषेयावर निर्मलकुमार फडकुले सभागृह पार्क चौक सिद्धेश्वर मंदिर शेजारी आयोजित केली आहे.
त्यानिमित्त आज प्रवचन मालेचा शुभारंभ,हभप,सुधाकर महाराज इंगळे,हभप,रमेश महाराज शिवापुरकर, भाजपचे नेते,मा.शहाजी भाऊ पवार,यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन, संत पूजन,व ग्रंथ पूजन करून प्रवचन मालेचा शुभारंभ करण्यात आला, यावेळी उपस्थित, हभप, अनिल महाराज देठे, हभप किसन बापू कापसे, हभप, प्रकाश महाराज पवार, हभप,निवृत्ती महाराज माने, हभप, संजय महाराज पवार,हभप,श्रीकांत महाराज चुंगे,श्री, शिवदास चटके सर,हभप,गणेश महाराज शिंदे, हभप, माऊली महाराज जरग, सद्गुरु बोधराज सेवा प्रतिष्ठान व अखिल भारतीय वारकरी मंडळ व सोलापूर शहर व जिल्ह्यातील भाविक व श्रोते मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते.

