Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

विजयपूर जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह पाऊस शेडचा पत्रा उडून महिलेचा मृत्यू, दोन जण जखमी

Responsive Ad Here

 


विजयपूर जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह पाऊस शेडचा पत्रा उडून महिलेचा मृत्यू, दोन जण जखमी


 विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

 जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला असून विजयपूर जिल्ह्यातील कोल्हार आणि बसवन बागेवाडी तालुक्यात जोरदार पाऊस आणि गारपीट झाली. अनेक ठिकाणी वीजांसह गारांचा पाऊस कोसळला. जोरदार वाऱ्यामुळे शेडचे पत्रे उडून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना बसवन बागेवाडी तालुक्यातील इंगळेश्वर गावाजवळील कोप्प तांडा येथे घडली.

 कोप्प तांड्याची रहिवासी सुनिता कांथू राठोड ही मरण पावलेली महिला आहे. ती मजुरीसाठी बाहेर गेली असताना ही दुर्घटना घडली. यामध्ये अजून दोन महिला जखमी झाल्या आहेत. बसवन बागेवाडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.