कुमठेकर परिवाराकडून श्री. कालिका देवीस शस्त्र व बांगड्या सुवर्ण मुलामा देऊन अर्पण
सोलापूर/ प्रतिनिधी
सोलापूर --येथील शुक्रवार पेठेतील विश्वब्राम्हण समाज कालिका देवी स आज चैत्र शुद्ध पंचमी दिवशी स्वर्गीय बाळासाहेब रामचंद्र कुमठेकर यांच्या परिवाराकडून सुवर्ण मुलामा देऊन आठ बांगड्या, शंख, नाग, तलवार, परशु, त्रिशूल, डमरू आदि भक्तीभावाने अर्पण करण्यात आले.
यावेळी जेष्ठ चिरंजीव व मंदिर समिती विश्वस्त श्री. प्रसाद कुमठेकर व त्यांच्या पत्नी सौ. लक्ष्मी, सौ. अमृता व श्री नंदकुमार कुमठेकर, सौ गौरी व ओंकार कुमठेकर,चिरंजीव केदारनाथ, अमरनाथ, रुद्र आणि कु. साक्षी आदि कुटुंबीय याप्रसंगी उपस्थित होते. गेल्या वर्षी देखील चैत्र शुद्ध पंचमी स श्री कालिका देवीस सोन्याचा मुलामा दिलेला नवीन किरीट अर्पण केला होता.