Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदी गुरुलिंगप्पा अंगडी यांची निवड

Responsive Ad Here



भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदी गुरुलिंगप्पा अंगडी यांची निवड





विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे  

भारतीय जनता पक्षाच्या विजयपूर जिल्हाध्यक्षपदी गुरलिंगप्पा अंगडी यांची निवड करण्यात करण्यात आली असल्याची निवडणूक अधिकारी माजी मंत्री शंकर पाटील मुनेनकोप्पा व भाजपाचे मागासवर्गीय विभागाचे राज्य उपाध्यक्ष विवेकानंद डब्बी यांनी अधिकृत घोषणा केली.

शहरातील भाजप जिल्हा कार्यालयात आयोजित एक साध्या समारंभात,  विद्यमान जिल्हाध्यक्ष आर.एस. पाटील यांनी नूतन जिल्हाध्यक्ष गुरलिंगप्पा अंगडी यांना पक्षाची शाल घालून आणि मिठाई खाऊ घालून जबाबदारी सोपवली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. 

जिल्हा भाजप कोअर कमिटीच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत, पक्षाचे निरीक्षक  विधान परिषद सदस्य अश्वथ नारायणगौडा यांनी बोलताना सांगितले की, ही एक संघटनात्मक आणि सहमतीने घेतलेला निर्णय व निवड आहे आणि माजी आमदार, विद्यमान संसद सदस्य, कोअर कमिटी सदस्यांच्या सल्ल्यानुसार गुरलिंगप्पा अंगडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे अधिकृतपणे जाहीर केले.

 माजी जिल्हाध्यक्ष आर.एस. पाटील कुचबाळ यांनी बोलताना सांगितले की, "माझ्यावर विश्वास ठेवून दोन कार्यकाळासाठी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती जिल्ह्यातील सर्व आमदार, माजी आमदार, खासदार ,  विविध विभागांचे प्रमुख , कार्यकत्यांचा सहकार्य केले आणि मला बळ दिले. आता नवीन जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या संघटनेला आणखी बळकटी देण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल," असे सांगितले.

या वेळी माजी मंत्री एस.के. बेल्लोबी, माजी आमदार ए.एस. पाटील नडहळ्ळी, रमेश भूसनूर, भाजप नेते विजुगौड पाटील, चंद्रशेखर कवटगी, कासुगौड बिरादार, संजीव ऐहोलि, साबु माश्याळ, मळुगौड पाटील, भीमाशंकर हदनूर, संदीप पाटील, राकेश कुलकर्णी, विजय जोशी, कृष्णा गुन्हाळकर आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.