Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

सिन्नूर येथील जल जीवन काम त्वरित करा; अन्यथा आंदोलन करण्यात येईल : सरपंच कल्पना सोनकांबळे

Responsive Ad Here

 सिन्नूर येथील जल जीवन  काम त्वरित करा; अन्यथा आंदोलन करण्यात येईल  : सरपंच   कल्पना सोनकांबळे






दुधनी /प्रतिनिधी - निंगप्पा निंबाळ 


  

अक्कलकोट पंचायत समिती येथे मौजे सिन्नूरचे सरपंच कल्पना सोनकांबळे यांनी जल जीवन मिशन योजना रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभाग  उप अभियंता यानां निवेदन दिले लवकरात लवकर काम चालू करून पूर्ण करण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल असे ते म्हणाले 


 मौजे सिन्नूर ग्रामपंचायत अंतर्गत चालू असलेल्या जल जीवन मिशन पाणी पुरवठा काम 1कोटी 36 लाख रुपये काम मंजूर असून तीन वर्ष झाले आत्तापर्यंत काम  अर्धवट ठेवण्यात आले आहे यावर्षी पाणी टंचाई वाढणार असून वेळेत काम न केल्याने ग्रामस्थांना पाणी साठी वणवण फिरावे लागणार आहे त्यामुळे सदर कामाचे ठेकेदार आणि पाणी टंचाई परिस्थिती झाल्यास त्यांनी गावात पाण्याची सोय करावे त्यासाठी पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यासाठी कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले

            यावेळी प्रकाश कळस गोंडा,लिंगराज हौदे,  ग्रामविकाअधिकारी अशोक म्हेत्रे , रुस्तम पठाण,कुलसूमबी पाटील, शकीर मुल्ला, राचम्मा पुजारी,अंबाबाई गायकवाड आदी ग्रामस्थ उपस्थित होते.