Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

शृंगेरी शारदा पीठाचे जगद्गुरू श्री विधुशेखर भारती स्वामीजी यांची महालक्ष्मी सहकारी बँकेस भेट

Responsive Ad Here



शृंगेरी शारदा पीठाचे जगद्गुरू श्री विधुशेखर भारती स्वामीजी यांची महालक्ष्मी सहकारी बँकेस भेट





विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

जिल्ह्यातील प्रतिष्ठित महालक्ष्मी सहकारी बँकेस शृंगेरी शारदा पीठाचे जगद्गुरू श्री विधुशेखर भारती स्वामीजी यांनी महालक्ष्मी सहकारी बँकेच्या कार्यालयास भेट देऊन, संचालक मंडळाच्या सदस्य व कर्मचाऱ्यांना आशीर्वाद दिले.  

या बँकेने गरिबांच्या कल्याणासाठी सदैव परिश्रम घेतले पाहिजे, चांगल्या आर्थिक सेवा  देऊन गरिबांना आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्नशील राहावे असा संदेश दिला.

 यावेळी महालक्ष्मी बँकेचे अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी महालक्ष्मी सहकारी बँक गेल्या अनेक दशकांपासून चांगली सेवा देत असल्याचे सांगून श्रीनिवासराव स्वामीराव देशपांडे यांनी 1930 मध्ये या बँकेची स्थापना केली असून बँकेच्या ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती दिली.

 उपाध्यक्ष विकास पदकी, संचालक विजय जोशी, कृष्णा गुन्हाळकर, गोविंद जोशी, शंकर राव कुलकर्णी, सचिन मुद्दीनमठ, पवन कुलकर्णी, बसवराज पत्तार,  समीर कुलकर्णी, बँकचे व्यवस्थापक पद्मावती कुलकर्णी कल्याणी संगम, कृष्णा जोशी व कर्मचारी उपस्थित होते.