४० लिटर शिंदी जप्त, एकास अटक
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
विजयपूर तालुक्यातील कराडदोडृ क्रॉस जवळ अबकारी विभागाने धाड घालून वासु शिवाजी घाटगे राहणार शिवाजी सर्कल जवळ विजयपूर यास अटक करून त्याच्याकडून १ लाख २८ हजार रुपयाची शिंदी जप्त करण्यात आली आहे
हा आरोपी आपली अॅटो नंबर KA-28 D-3604 मध्ये ४० लिटर शिंदी अनधिकृतपणे विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करत असताना पकडला गेला. त्याला स्थानिक पंचनाम्या करुन ताब्यात घेतले गेले आहे. अबकारी खात्याचे अप्पर आयुक्त डॉ. वाय मञ्जूनाथ, अबकारी अप्पर आयुक्त एफ.एच. चलवादी, अबकारी उप-आयुक्त मुरलीधर, उप निरीक्षक एस.एन. हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली महादेव पूजारी, निरीक्षक उप विभाग विजयपूर यांनी धाड घालून हे प्रकरण दाखल केले आहे. या धाडीत अबकारी पोलिस कर्मचारी पी के कुबांर,, एम एल पूजारी, यल्लप्पा बजंत्री आणि विठ्ठल हे सहभागी होते.