मोटरसायकला ट्रकची धडक, अपघातात एक ठार, तीन विद्यार्थीनी जखमी
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
तालुक्यातील कुमटगी तांडाचा रहिवासी वेंकू चव्हाण हा आपल्या दोन मुली व शेजारील एका मुलीस घेऊन कग्गोड येथे
एस.एस.एल.सी. परीक्षा केंद्रावर मोटरसायकलवरून (के.ऐ.२८एच.एल. ५६०३) घेऊन जात असताना तेलंगणा वरुन आलेल्या ट्रक नं टी.एस.१५ यू. ए. ८०५५ याची धडक बसून झालेल्या अपघातात मोटरसायकल स्वार वेंकू चव्हाण (वय ४३) हा जागीच ठार झाला तर त्याचा मुली ऐश्वर्या चव्हाण, प्रिती चव्हाण व त्यांच्या घराशेजारी राहणारी श्वेता या तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना शहरातील बीएलडीई संस्थेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे
विजयपूर तालुक्यातील कागोळ येथील एनएच ५२ वर हा अपघात झाला असून
विजयपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
पालकमंत्री पाटील यांच्याकडून जखमी विद्यार्थ्यांनीची विचारपूस -
जिल्हा पालकमंत्री डॉ एम बी पाटील यांनी बीएलडीई रुग्णालयात जाऊन तीनही जखमी विद्यार्थ्यांनीचा प्रकृतीची चौकशी करून, डॉक्टरांकडून माहिती घेतली व त्यांच्यावर चांगले उपचार करण्याचे निर्देश दिले.