सहकार भारतीच्यावतीने नूतन जिल्हाध्यक्ष अंगडी यांचा सत्कार
विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झालेल्या गुरुलिंगप्पा अंगडी यांचा सत्कार सहकार भारती संघटनेच्या वतीने करण्यात आला. याप्रसंगी सहकार भारतीचे जिल्हाध्यक्ष श्रीहर्षगौडा पाटील, विभागिय कार्यदर्शी सुभाष इंडी, जिल्हा सचिव परशुराम चिंचली, जिल्हा संघटना सचिव दीपक शिंत्रे, श्री सिद्धेश्वर सहकारी बँकेचे अध्यक्ष विजयकुमार इजेरी, मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष रविंद्र बिज्जरगी, सिद्धेश्वर सहकारी बँकेचे संचालक मंडळाचे सदस्य अमित नायवाडी व इतर उपस्थित होते.