Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

कृषी पणन मंडळाच्या मिलेट व फळ महोत्सवात रुपये 25 लाखांची विक्री

Responsive Ad Here

 कृषी पणन मंडळाच्या मिलेट व फळ महोत्सवात रुपये 25 लाखांची विक्री 





कोल्हापुर/ प्रतिनिधी- 

महाराष्ट् राज्य कृषी पणन मंडळ कोल्हापूर विभागाने दिनांक 1 मार्च ते 5 मार्च 2025 रोजी मिलेट व फळ महोत्सवाचे वी टी पाटील सभागृहामध्ये आयोजन केले होते


सदर मिलेट महोत्सवामध्ये राज्यातील नऊ जिल्ह्यांमधून मिलेट उत्पादक व फळ उत्पादक शेतकरी आलेले होते. महोत्सवातील एकूण 45 स्टॉलमध्ये विविध प्रकारच्या मिलेट उत्पादनांची व फळांची विक्री करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने ज्वारी 100 क्विंटल, नाचणी 20 क्विंटल, मिलेट्स 60 क्विंटल, तसेच 580 किलो स्ट्रॉबेरी, 600 किलो अंजीर, 70 किलो गुजबेरी 35 किलो मध आणि 10 क्विंटल द्राक्ष, एक्सपोर्ट क्वालिटीचे डाळिंब 400 किलो विक्री झालेली आहे. शेवटच्या दिवशी महोत्सवामध्ये महिलांसाठी मिलेटच्या पाककृतींची स्पर्धा घेण्यात आलेली होती. या स्पर्धेसाठी एकूण 30 महिलांनी सहभाग घेतलेला होता. सदर पाककृतींची पर्यवेक्षण करण्यासाठी प्रामुख्याने महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मिलेट संशोधन केंद्राचे डॉक्टर योगेश बन, एस जी एम महाविद्यालय कराड येथील फूड सायन्स विभागाच्या प्राध्यापक डॉक्टर अहिल्या वाघमोडे, वखार महामंडळ कोल्हापूरच्या सौ तृप्ती कोळेकर तसेच सावंत ऑरगॅनिकच्या जिजामाता कृषी भूषण पुरस्कार प्राप्त सौ पूजा सावंत यांनी पर्यवेक्षण केले. सदर पाककृती स्पर्धेमध्ये सर्वच सहभागीदार महिलांनी अतिशय उत्कृष्ट अशा पाककृती ठेवलेल्या होत्या. त्यामध्ये सौ विद्या शिंदे यांनी मिलेटची पौष्टिक थाळी ठेवलेली होती. त्यास स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त झाला तसेच सौ मयुरी रानमाळे यांनी वरी भगर पासून क्रिस्पी बॉल्स तयार केलेले होते त्यास द्वितीय क्रमांक प्राप्त झालेला आहे तसेच संजीवनी प्रभावळे या ज्येष्ठ महिलांनी भगरीची खीर ठेवलेली होती त्यास तृतीय क्रमांक प्राप्त झालेला आहे. त्याचप्रमाणे कुमारी शिवानी बिक्कड यांनी नाचणीचे सूप शेवग्याच्या रसासह ठेवलेले होते त्यास उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त झालेले आहे मागील वर्षी कोल्हापूरमध्ये मिळालेला प्रतिसाद विचारात घेता यावर्षी करवीरवासीयांनी मिलेट व फळ महोत्सवास प्रचंड प्रतिसाद दिलेला असून महोत्सवामध्ये रक्कम रुपये 25 लाख उलाढाल झालेली आहे.




    पाककृती स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र , सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलं. सदर कार्यक्रमासाठी माननीय श्री महेश कदम विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर विभाग हे उपस्थित होते. श्री महेश कदम यांच्या शुभहस्ते मान्यवर विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी श्री महेश कदम यांनी विजेत्या महिलांचे अभिनंदन केले व तयार केलेल्या मिलेटच्या विविध पदार्थांचे कौतुक केले. सदर कार्यक्रमास डॉक्टर अहिल्या वाघमोडे, श्रीमती सूर्यप्रभा भोसले, सौ तृप्ती कोळेकर, सौ पूजा सावंत, श्री पी डी सावंत, कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉक्टर सुभाष घुले, श्री प्रतीक गोनुगडे, श्री ओंकार माने, श्री प्रसाद भुजबळ, अमृता जाधव, सुयोग टकले, संदेश पिसे, किरण जाधव, श्री अनिल जाधव व श्री बबनराव रानगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.