अंजुमान पदवी महाविद्यालयच्या प्राचार्यपदी डॉ एस.जे. जहागीरदार
विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
येथील अंजुमान पदवी महाविद्यालयच्या प्राचार्यपदी सूत्रे डॉ एस.जे. जहागीरदार यांनी स्वीकारली. डॉ जहागीरदार हे शिक्षण क्षेत्रात दीर्घ अनुभवी शिक्षणतज्ज्ञ असून, या पूर्वीही त्यांनी महत्त्वाचा पदांची जबाबदारी सांभाळली आहे. त्यांनी महाविद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी नवनवीन उपक्रम राबविले असून, महाविद्यालयास एन ऐ ऐसी द्धारे सलग तीनदा ऐ ग्रेड मिळविले आहे.
याप्रसंगी बोलताना डॉ जहागीरदार म्हणाले, शिक्षण हे केवळ नोकरी मिळवण्यासाठी नसून, ते समाजाच्या विकासासाठी एक साधन आहे विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच सामाजिक जबाबदारी स्वीकारायला हवे असे सांगून महाविद्यालयचा प्रगतीसाठी विविध संशोधन आणि नवसंशोधन उपक्रम राबविले जातात गुणवत्ता सुधारण्यासाठी गुणवत्ता हमी कक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून नवीन तंत्रज्ञानाची माहिती दिली.
याप्रसंगी अंजुमान -ए- इस्लाम संस्थेचे अध्यक्ष जनाब महंमद पीरा पीरजादे हाश्मी, उपाध्यक्ष जनाब सय्यद जैनुल आबेदीन पीरजादे हाश्मी, सचिव जनाब अब्दुल हमीद अथणी, इम्तियाज कादरी मुश्रीफ, महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.