कुष्ठरोग शोध अभियानाची केंद्र शासनाचे पथकाकडून पाहणी
सोलापूर/ प्रतिनिधी
जिल्ह्यात दि. ३१ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२५या कालावधीत कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येत आहे. सदरचे अभियानाची पाहाणी करण्यासाठी सेंट्रल लेप्रसी डिव्हिजन, नवी दिल्ली. या पथकात मा.डॉ. सपना मॅडम उपसंचालक, मा.डॉ कानगुले साहेब सहायक संचालक आरोग्य( कुष्ठरोग व क्षयरोग) कार्यालय पुणे, श्री. मिलिंद तोडेवाले, राज्यस्तरीय अवैद्यकिय पर्यवेक्षक पुणे,यांचा समावेश होता.
पथकाने दि. ११ व १२ फेब्रुवारी २०२५ रोजी जिल्ह्यातील टेंभुर्णी, पिंपळनेर, अनगर, बोरामणी या प्राथमिक आरोग्य केंद्रे व कुर्डु, होनसळ या उपकेंद्राना भेटी दिल्या. अभियानाचे प्रत्यक्ष घर भेटी देऊन सर्वेक्षण काम , शोधण्यात आलेल्या रूग्णांची पडताळणी व कुष्ठरोग कामाचा आढावा घेतला.
या पथकात मा.डॉ.सुधीर वंजे साहेब अतिरिक्त संचालक, मा.डॉ. सपना मॅडम उपसंचालक, मा.डॉ कानगुले साहेब सहायक संचालक आरोग्य कुष्ठरोग व क्षयरोग कार्यालय पुणे, श्री. मिलिंद तोडेवाले अवैद्यकिय पर्यवेक्षक पुणे,यांचा समावेश होता. पथकाने कामाबाबत समाधान व्यक्त करून, निदर्शनास आलेल्या त्रुटीची पुर्तता करण्याबाबत मार्गदर्शन केले.
या पथकाचे स्वागत डॉ.मोहन शेगर, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग), सोलापूर, यांनी केले.
यावेळी डॉ. आनंद गोडसे, जिल्हा केंद्रीय पथक,(कुष्ठरोग विभाग) यांनी अभियानाशी निगडित घेण्यात आलेल्या कार्यक्रमा विषयी डॉ. राऊत राव मंँडम, वैद्यकीय अधिकारी, पर्यवेक्षकीय नागरी कुष्ठरोग पथक यांनी सोलापूर शहरातील अभियानाची माहिती दिली. डॉ. खांडेकर व डॉ. पाथरूटकर तालुका आरोग्य अधिकारी माढा,मोहोळ व कर्मचारी उपस्थित होते.