Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

दुधनीमध्ये रेशनच्या तांदुळाची होतोय, अनाधिकृत ब्रँडेड तांदुळ विक्री!

Responsive Ad Here

 दुधनीमध्ये रेशनच्या तांदुळाची होतोय, अनाधिकृत ब्रँडेड तांदुळ विक्री!






अक्कलकोट-  होय खरेच ऐकलात;  तालुक्यातील दुधनी शहरात स्वस्त धान्याची तांदुळ  काळ्या  बाजारात खरेदी करून छोट्या- मोठ्या दुकानदारांनी  दुधनीतील अवैद्य तांदुळ कारखानदारीला विक्री करत असल्याचे गोपनीय माहिती मिळाली आहे. 

      दुधनी शहरात सध्या जुगार सोडुन इतर अवैध धंदे " गंदा है, पर धंदा है ये!" या म्हणीला पोलिस प्रशासन, तहसीलदार, अन्न पुरवठा अधिकारी शामील असल्याचे चित्र गोरगरिबांच्या समोर येत आहे.तसेच दुधनीतील रेशनच्या तांदुळाची होतोय, ब्रॅन्डेड तांदुळ विक्री! कर्नाटक व महाराष्ट्र, आंध्र प्रदेशात होतोय रेशनची तांदुळाची ब्रॅन्डेड तांदुळ विक्री. 

    दुधनी गावात येणार्या अवैध तांदुळ खरेदी- विक्री बाबता कर्नाटक व दुधनी शेजारील भागतच्या बातम्या " सोलापूर 24तास न्युज चॅनेल " नी ह्या अगोदर बातमी प्रशासनाच्या निदर्शनास आणले होते मात्र अद्याप ही अवैध तांदुळ विक्री व कारखाना विरुद्ध कारवाई करण्यात आली नाही मात्र " सोलापूर 24तास न्युज चॅनेल " चे संपादक व प्रतिनिधीनां जिवे मारण्याची धमकी मात्र येतच आहेत. 

     अवैध तांदुळ खरेदी व विक्री करणार्यांवर अद्यापही कारवाई नाही पोलिस प्रशासन , रेशन पुरवठा विभाग, जिल्हाधिकारी या अवैध धंद्यांवर दुर्लक्ष करीत आहेत असा प्रश्न गोरगरिबांना होत आहे. 

    रेशन माफीया गोरगरिबांचा हक्काचे तांदुळ ब्लॅकमध्ये, ब्रॅन्डेड तांदुळ विक्री करीत आहेत आणि दुधनी शहरात यांची मोठी टोळी व प्रशासनाचा हात असल्याचे दावा दुधनी नागरिकांनी करत आहेत तरी या अवैध तांदुळाची तस्करी विरोधात लक्षपूर्वक कारवाई कधी होणार याची वाट सध्या दुधनीतील नागरिक करित आहे.