Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

विजयपूरात बहुभाषा कविसंमेलन दि १६ रविवार रोजी

Responsive Ad Here

 


   कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेतर्फे 

   विजयपूरात  बहुभाषा कविसंमेलन दि १६ रविवार रोजी 








विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

   रविवार,दि. 16 फेब्रुवारी रोजी कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेतर्फे  विजयपूर जिल्हा करामसापच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ निमित्त बहुभाषा कविसंमेलनाचे आयोजित करण्यात आले आहे.

        शहरातील सेटलाईट बसस्थानक समोरील हाॅटेल भवानी सभागृहात होणाऱ्या या संमेलनात मराठी, कन्नड, हिंदी,उर्दू आणि गुजराती सह विविध भाषिक कवी सहभागी होणार आहेत.

         या संमेलनाचे उद्घाटन  अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे उपाध्यक्ष व करामसाप कलबुरगी राज्य अध्यक्ष गुरय्या रे.स्वामी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

  प्रमुख पाहुणे म्हणून कलबुरगी करामसाप कार्यवाह प्रभाकर सलगरे, बागलकोट करामसाप अध्यक्षा कवी सौ सुधा बेटगेरी चिक्कोडी करामसाप अध्यक्षा कवी लता माने संकेश्वर, कवी प्रकाश राजपूतसह या भागातील नामवंत कवि सहभागी होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षपद करामसाप विजयपूर जिल्हाध्यक्ष दीपक शिंत्रे  भूषविणार आहेत.

  यावेळी करामसाप विजयपूर जिल्हा पदाधिकारी डॉ. सदाशिव पवार उपाध्यक्ष,  श्री कन्हैया पेठकर कार्यवाह, प्रा. गंगाधर गेंड. सहकार्यवाह  श्री.सुधाकर शिंदे खजिनदार डॉ. एस.जे. जहागिरदार श्रीपाद पाटणकर,सौ. रुपा हिबारे, प्रा. रेखा अध्यापक,प्रा. रेवती कट्टी,प्रा. उल्का जाधव या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे 

    काव्य रसिकांनी या बहुभाषिक कविसंमेलनास उपस्थित राहून  कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन विजयपूर जिल्हा करामसाप तर्फे करण्यात आले आहे.