Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

स्वसंरक्षणासाठी पोलिसांचा गोळीबार, आरोपी जखमी

Responsive Ad Here

 

स्वसंरक्षणासाठी पोलिसांचा गोळीबार,  आरोपी जखमी






विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

आज विजयपूरात पुन्हा एकदा गोळीबाराची घटना,  यावेळी गुंडांनी गोळीबार केला नाही  तर पोलिसांनी,,,,

खून प्रकरणातील आरोपीला देशी पिस्तूल पुरवणारा आरोपी अटक करण्यासाठी गेला तेव्हा पोलिसांनी गोळीबार करून आपली कर्तृत्वाची धमक दाखवली आहे 

 २८ जानेवारी रोजी विजयपुर जिल्ह्यातील तिकोटा तालुक्यातील अरकेरी एलटी १ येथील मानवरदोड्डीजवळ झालेल्या सतीश राठोड  हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपीस सतीश राठोड हत्या प्रकरणातील  आरोपी सुरेश राठोडच्या पायाला गोळी लागली आहे .



विजयपुर शहराच्या बाहेरील महिला विद्यापीठाजवळ ही घटना घडली. विजयपुर ग्रामीण पोलिस ठाण्याचे पीएसआय विनोद यांनी हत्येसाठी देशी पिस्तूल पुरवणाऱ्या आरोपी सुरेशला   विशिष्ट माहिती मिळाल्यानंतर विजयपुर ग्रामीण पोलिस त्याला अटक करण्यासाठी जात असताना सुरेशने चाकूने हल्ला केला .  

सतीशच्या हत्येसाठी देशी पिस्तूल पुरवणारा सुरेश राठोड शहराच्या बाहेरील अथणी रोडजवळ लपला होता. या गोळीबारात पीएएसआय विनोद दोडामणी आणि एक कर्मचारी जखमी झाले. सध्या,  पीएसआय विनोद दोडमनी आणि एका पोलिस कॉन्स्टेबलला शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबार्गी आणि एएसपी रामनगौडा हट्टी आणि इतर अधिकाऱ्यांनी रुग्णालयाला भेट देऊन 

पीएसआय आणि पोलिस कॉन्स्टेबलने आरोग्या संदर्भात विचारपूस केली आहे. 

नंतर,  लक्ष्मण निंबर्गी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सतीश राठोड यांची २८ तारखेला हत्या करण्यात आली होती या प्रकरणातील आरोपीच्या अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसावर आरोपीने चाकूने हल्ला केला स्वसंरक्षणासाठी झाडलेल्या गोळी आरोपीचा पायाला  लागल्याने सुरेश राठोड याला

 जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे असे सांगितले.