Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

गवळी समाज संघटनेच्या एकजुटीतून श्रीकृष्ण चषक स्पर्धा उत्साहात संपन्न

Responsive Ad Here

 गवळी समाज संघटनेच्या एकजुटीतून श्रीकृष्ण चषक स्पर्धा उत्साहात संपन्न





नालासोपारा : नालासोपारा पश्चिम येथे गवळी समाज संघटना (वसई, नालासोपारा, विरार,नायगाव) च्या एकजुटीचे प्रतीक ठरलेली श्रीकृष्ण चषक क्रिकेट स्पर्धा मोठ्या जल्लोषात पार पडली. समाजाच्या एकात्मतेचा संदेश देत या स्पर्धेचे आयोजन यशस्वी करण्यात आले. कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून संघटनेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.


श्री कृष्ण चषक २०२५ या कार्यक्रमाला महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट, मीरा भाईंदर गवळी समाज, तळा तालुका गवळी समाज ,यादव सहाय्य समिती गोवेळे विभाग आणि मैत्री प्रतिष्ठान मुंबई या प्रमुख सामाजिक संस्थांच्या पदाधिकारी यांची उपस्थिती होती.


प्रमुख पाहुणे म्हणून आमदार  राजनजी नाईक, माजी सभापती प्रशांतजी राऊत, शिवसेना (शिंदे गट) विरार शहर प्रमुख  निलेश तेलंगे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) शहर प्रमुख  उदय जाधव, प्रहारचे जिल्हाध्यक्ष  हितेश जाधव, समाजसेवक झहीर भाई शेख, मनसेचे  विजय गायकर, उद्योजक मंगेश पवार, समाजसेवक सुधीर वरणकर, उद्योजक  मंगेश चिले तसेच समाजातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 श्रीकृष्ण चषक २०२५ विजयी संघ

🥇 प्रथम क्रमांक : श्री समर्थ क्रिकेट संघ, चंदनवाडी

🥈 द्वितीय क्रमांक : आई गावदेवी क्रिकेट संघ, पांगलोली

🥉 तृतीय क्रमांक : जय हनुमान क्रिकेट संघ, पळसगाव खुर्द


कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी आपल्या एकजुटीची ताकद दाखवली.  विपुल पोरे, दिनू रिकामे, विशाल रिकामे, विलास धुमाळ, सुशांत घोले, संतोष तटकरे, विनोद रिकामे, अभिनंदन नटे तसेच इतर कार्यकारिणी सदस्य आणि महिला वर्गाने मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  अविनाश काते यांनी केले. .


संघटनेच्या सहकार्याने आणि एकतेच्या बळावरच हा भव्य कार्यक्रम यशस्वी झाला.