निवृत्त बॅंक कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा,जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
पेन्शन रिव्हिजन करण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्यांनी धरणा सत्याग्रह केला व त्यानंतर आंबेडकर सर्कल, बसवेश्वर सर्कल, मध्यवर्ती बसस्थानक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन त्यांनी मागण्यांचे निवेदन अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री.सोमलिंग गेन्नूर यांच्यामार्फत केंद्रीय अर्थमंत्र्यांना दिले.
ऑल इंडिया रिटायर्ड बँक एम्प्लॉईज युनियनचे सरचिटणीस श्री विश्वनाथ नाईक म्हणाले की, देशातील सर्व सेवानिवृत्त बँक कर्मचारी संघटना गेल्या ३ दशकांपासून केंद्र सरकार आणि बँक व्यवस्थापन मंडळ, इंडियन बँकर्स असोसिएशन यांच्याकडे पेन्शन रिव्हिजनची मागणी करत आहेत. , भारतीय रिझर्व्ह बँक, केंद्र सरकार निवृत्ती वेतन धारकांना पेन्शन रिव्हिजन न करता हे सर्व वृद्ध बँक सेवानिवृत्तांची पिळवणूक करत आहेत. या ज्येष्ठांचे दु:ख लक्षात घेऊन निवृत्त वेतन सुधारणा आणि इतर मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. वित्त मंत्रालय आणि प्रशासकीय मंडळांनी प्रतिसाद न दिल्यास आम्ही सर्व 8 लाख सेवानिवृत्त कर्मचारी संघर्ष सुरू ठेवण्यास कटिबद्ध आहोत. बँक संघटनांच्या संयुक्त युनियनने निर्णय घेतला आहे.
याच प्रसंगी ऑल इंडिया बँक रिटायर्स युनियनचे सहसचिव एम. एस. भट्ट म्हणाले, "आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आयुष्याच्या अखेरीस संघर्ष करावा लागतो हे दुर्दैवी आहे. हा संघर्ष सर्व राज्यात आणि सर्व जिल्ह्यांमध्ये पसरणार आहे. सरकारने डोळे उघडून आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात, अशी विनंती त्यांनी केली. ऑल इंडिया सिंडिकेट बँक रिटायर्ड एम्प्लॉईज युनियनचे उप सरचिटणीस अजय कुमार आणि ऑल इंडिया कॅनरा बँक फिल्ड सेक्रेटरी मुनी कृष्णप्पा, महाराष्ट्र बँक रिटायर्ड एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष सुभाष देशपांडे, ऑल इंडिया सिंडिकेट बँक रिटायर्ड एम्प्लॉईज युनियनचे राज्य सचिव के मणी इ. सहभागी झाले.
निवृत्त बॅंक कर्मचारी विजयपूर जिल्हा अध्यक्ष विठ्ठल काळे, सरचिटणीस श्री.अशोक उपाध्याय यांची भाषणे झाली आणि सर्व मागण्या मान्य होईपर्यंत संघर्षासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.
संघटना सचिव महादेव हलल्ली, , जगदीश मोटगी, पी एस पुराणिक, व्ही आर कुलकर्णी, ईरण्णा चिम्मलगी, एस ए कुलकर्णी यांच्या सह
विजयपूर, बागलकोट, कलबुर्गी, बेळगावी जिल्ह्यातील सुमारे 250 सेवानिवृत्त कर्मचारी सहभागी झाले होते.

