सिन्नर कृषी विभागाची शेतकर्यांसह बारामती कृषी प्रदर्शनास भेट
राम सुरसे / वावी प्रतिनिधी
अॕग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट कृषी विज्ञान केंद्र बारामती आयोजीत जागतीक दर्जाच्या कृषिक २०२५ या प्रात्यक्षकयुक्त प्रदर्शनास शनिवार दि. १८ रोजी सिन्नर तालुका कृषी विभाग अधिकारी व तालुकतील बहुसंख्य शेतकरी वर्गाने भेट दिली.सिन्नर तालुक्यातील शेतकरी वर्गास सदर प्रदर्शनास भेट घडवून आणण्यासाठी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे,
विभागीय सह संचालक नासिक सुभाष काटकर, आत्मा प्रकल्प संचालक अभिमन्यू काशिद, सिन्नर ता.कृषि.अ.ज्ञानेश्वर नाठे यांचे विशेष सहकार्य लाभले.
सदर प्रदर्शनात विविध उपक्रम राबवीलेले आहे. त्यामध्ये मायक्रोसॉफ्ट व जगातील सर्वोत्तम ऑक्स्फर्ड विद्यापीठ लंडन या संस्थांचे सहकार्य महत्त्वपूर्ण ठरले आहे. त्यातून यशस्वी ठरलेले कृत्रिम बुद्धिमत्तेसारखे विविध उपक्रम शेतकऱ्यांच्या शेतीला दिशादर्शक ठरत आहेत. कृषिक हे कृषी प्रदर्शन ११० एकर क्षेत्रावर उभारले आहे. गुरुवार ते सोमवार (ता.१६ ते २०) या कालावधीत हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी बसणे खुले असणार आहे.
लाखो शेतकरी वर्गास प्रात्याक्षिक आधारित प्रदर्शन पाहावयास मिळत आहे. नवीन बियाणे, तंत्रज्ञान, खते केवळ पिशव्यांमधून दाखविण्याऐवजी त्यांचा वापर प्रत्यक्ष शेतीत यशस्वी झाल्याचे प्रयोग समक्ष बसणे मिळत असल्याने शेतकर्यांसाठी हि एक पर्वणी आहे.
प्रदर्शनास भेट प्रसंगी श्री. ज्ञानेश्वर नाठे तालुका कृषी अधिकारी सिन्नर, नितीन पगार, अशोक अल्हट, अशोक बागुल मंडळ कृषी अधिकारी, दादासाहेब जोशी, विनोद सांगळे, अनिल दातीर कृषी पर्यवेक्षक
मंडळ कृषी अधिकारी श्री अशोक बागुल, नीतीन पगार, अशोक आल्हाट कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक संगीता दवंगे,नितिन खिंडकर, नीता खांडेकर, शीतल उगले, वनिता शिंदे,गायत्री जाधव, श्रीमती दये, लावरे, हसे सह राम सुरसे, सोमनाथ शिंदे, राजेंद्र सापनर, साहेबराव गरड, बाळासाहेब वाघ सह सिन्नर तालुक्यातील असंख्य शेतकरी उपस्थित होते.
कृषिक प्रदर्शनात ऑफ द फ्यूचरची उभारणी, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे वाढवलेला ऊस, नावीन्यपूर्ण देशी विदेशी फळझाडांची लागवड, परदेशी कटफ्लॉवरची प्रात्यक्षिके, शेवंतीच्या २९ प्रकारची फुलशेती, काळा टोमॅटोसह २९ प्रकारचे टोमॅटोचे देशी वाण, काळी मिरची व मिरचीचे विविध प्रात्याक्षिके, जिरायती शेतीसाठी ज्वारीचे विविध वाण व तुर्की बाजरी, कापसाची नवी तंत्रज्ञानावर आधारित लागवड व काढणी प्रात्याक्षिके, स्वतंत्र पशुदालन, भरडधान्य पाहावयास मिळणार आहे. तसेच नेदरलॅंड, चीन, अमेरिका, इस्राईल, ब्राझील, स्पेन, इटली, आफ्रिका, फ्रान्स, थायलंड, कोरिया, जपान, इंग्लंड (UK), ऑस्ट्रेलिया आदी देशांतील विविध एआय-सेन्सर व रोबोटिक तंत्रज्ञान,विविध शेती उपयोगी ट्रॅक्टर दलित यंत्र, सोलर बघण्यास मिळाले मुळे सिन्नर तालुक्यातील ४००/५०० शेतकरी यांनी सदर प्रदर्शनास भेट दिली. प्रदर्शन बघीतले मळे शेतकर्यांचे ज्ञानात निश्चित भर पडणार असून त्याचा अवलंब शेतकर्यांनी आपल्या शेतात करावा.
