सिन्नर तालुक्यातील तरूणांची ७१० किमी
सायकलस्वारी
निसर्ग संवर्धन,निरोगी व सदृढ शरीरासाठी प्रबोधन
वावी प्रतिनिधी - राम सुरसे
सिन्नर तालुक्यातील शिंदेवाडी (श्रीरामपूर)येथून रविवार दि. १२ जानेवारी रोजी तीन तरुणांची शिंदेवाडी ते तुळजापूर अक्कलकोट गाणगापूर सायकलवारीसाठी प्रस्थान केले. जवळपास ७१० किलोमीटर अंतर पार करत सहा दिवसात सदर तरूण गाणगापूर येथे पोहचणार आहे. या तरूणांबरोबर जय भवानी सामाजिक व
सांस्कृतिक संस्था पिंपळगाव जलाल, जिल्हा विधि सेवा प्राधिकरण गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने सदर प्रवासआयोजित केलेला असून या सायकल प्रवासाचे हे १९ वे वर्ष आहे.
आहील्यानगर, जामखेड, येरमाळा, तुळजापूर, अक्कलकोट असा प्रवास करत सायकल यात्रा दि. १७ रोजी गाणगापूर येथे यात्रेचा समारोप होणार आहे.
सायकल यात्रेमधील मुख्य उद्देश निसर्ग संवर्धन व निरोगी व सदृढ शरीर राखणे हा असून शिंदेवाडी येथील गोरक्षनाथ घोटेकर,नितीन कोकाटे, प्रदीप हांडोरे हे तीन ध्येयवेडे तरुण मागील काही वर्षापासून या सायकल यात्रेला जातात. या तरुणांना सायकल यात्रेसाठी शुभेच्छा देण्यासाठी गावातील पोलीस पाटील शांताराम कोकाटे,सोपान यादव,शांताराम हांडोरे, प्रकाश खाडे,बाबासाहेब हांडोरे सह ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.
यात्रेत प्रामुख्याने सडक अर्जुनी न्यायालयाचे न्यायाधीश डॉ. विक्रम आव्हाड व गोंदिया येथील ६ व्या न्यायालयाच्या न्यायाधीश डॉ. संगीता आव्हाड यांनी सहभाग घेतला. सायकलचा वापर करून आपले आरोग्य निरोगी ठेवावे असा संदेश संस्थेचे अध्यक्ष विजय भोरकडे यांनी यावेळी बोलतांना दिला. यात्रा अहिल्यानगर, जामखेड, येरमाळा, तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर या मार्गान जनजागृती करत जात आहे. सायकल प्रवासात संस्थेचे अध्यक्ष विजय भोरकडे,नितिन कोकाटे,
गणेश भोरकडे, नवनाथ भोरकडे, किशोर खोकले, रोहित पाटील, विशाल खोकले, बाळासाहेब बनकर, गणेश मोरे, मेजर युवराज गांगवे, साईनाथ मामा गायकवाड, प्रदीप हांडोरे, गोरख घोटेकर, सुमेधा अभंग, मनिष खोकले, प्रभाकर डुंबरे, गोरख बनकर, सागर झाव अक्षय बनकर, ७८ आणि ६८ वर्षांचे सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षिकांसह तीस तरूण सहभागी झालेले आहे.
सदर यात्रेदरम्यान कायदे विषयक मार्गदर्शन शिबिर, पर्यावरणचा होणारा ऱ्हास थांबवणे, ठीक ठिकाणी वृक्षारोपण करुन सायकलचा जास्तीत जास्त वापर करावा तसेच मकर संक्रांती निमित्त पतंग उडविताना नायलॉन मांजाचा वापर करणे कायद्याने गुन्हा असून त्याचा वापर टाळावा या सबंधी जनजागृती करण्यात येणार येत आहे.
नासिक जिल्ह्यातील समस्त तरुणांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे.सायकल प्रवास करत पर्यावरणाचे, आरोग्याचे महत्व सायकलस्वार पटवून देत मोठे समाजकार्य करत आहे.
विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने सायकल यात्रेचे प्रतिवर्षी आयोजन करण्यात येत असून या यात्रेदरम्यान सामाजिक संदेश देत कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात येत आहे. या यात्रेचा देशातील तरुणांनी आदर्श घ्यावा. सर्वच सायकल स्वारांचे अभिनंदन व प्रवासास हार्दीक शुभेच्छा.
कृषीमंत्री नामदार श्री. माणिकराव कोकाटे, नासिक
* सायकलवरील लक्षवेधी फलक :-
भांडणापेक्षा समझोता बरा....त्यातच आनंद आहे खरा.....,विधी सेवा प्राधिकरण जिथे...जिथे अन्यायाला वाचा फोडे तिथे तिथे...., साधता संवाद संपतील वाद....न्याय सबके लिये.....आदी फलकही लक्ष वेधून घेत आहेत.


