भावसार महिला मंडळाच्या वतीने 4 फेब्रुवारी रोजी रथसप्तमी व हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन
विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
भावसार क्षत्रिय समाज महिला मंडळाच्या वतीने रथसप्तमीच्या दिवशी दि. 4 फेब्रुवारी मंगळवार रोजी सायंकाळी चार वाजता रथसप्तमी व हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील आनंद नगर येथील भावसार सांस्कृतिक भवनात भावसार महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ पद्माताई इजंतकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून प्राध्यापक रेखा कुलकर्णी या उपस्थित राहणार असून त्या
" आजची पिढी, आईचे कर्तव्य व जबाबदारी ". या विषयावर संबोधित करणार आहेत.
तसेच या कार्यक्रमात सूर्य नमस्कार, सांस्कृतिक नृत्य, लघु नाटीका व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
समाजातील महिला, तरुणी, व लहान मुलामुलींना आपल्यातील कलागुणांना सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे. तरी समाज महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे
असे महिला मंडळाच्या सेक्रेटरी सौ. लताताई झिंगाडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.