Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

पुणे विमानतळाला संत तुकाराम महाराजांचे नाव

Responsive Ad Here

 



उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधानसभेत मांडला ठराव


पुणे विमानतळाला संत तुकाराम महाराजांचे नाव देण्याचा

प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्याचा ठराव विधानसभेत मंजूर





 नागपूर/वृत्त -  पुणे येथील लोहगाव विमानतळाचे 'जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ', पुणे असे पुनर्नामकरण करण्याचा  शासकीय ठराव उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत मांडला आणि त्यास तात्काळ मंजरीही देण्यात आली.  


 महाराष्ट्र विधानसभा नियम 110 अनुसार लोहगाव विमानतळ, पुणे येथील विमानतळाचे 'जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ', पुणे असे पुनर्नामकरण करण्याची शिफारस केंद्र शासनाला करण्याचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला.