वसंत पोतदार व विजयकुमार पोतदार यांना राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार जाहीर
गौरव कर्तृत्वाचा- सोलापूर चे वसंत पोतदार व विजयकुमार पोतदार यांना राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार जाहीर
सोलापूर / प्रतिनिधी
सोलापुर--- दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ नासिक च्या वतीने पत्रकार दिनानिमित्त राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्काराची घोषणा राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे यांनी केली असून यात सोलापूर येथील श्री वसंत पोतदार व श्री विजयकुमार पोतदार यांच्या सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय आणि लक्षवेधी कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय *राष्ट्रीय कर्मयोगी सन्मान पुरस्कार* घोषित करण्यात आला आहे. हा राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभ रविवार दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी दुपारी 2 : 30 वाजता रोटरी क्लब सभागृह, गंजमाळ, शालिमार जवळ नाशिक येथे हा कार्यक्रम अतिविशिष्ट मान्यवरांच्या उपस्थित संपन्न होणार आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना या प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये गेली तीन दशके सामाजिक कार्यात सहभागी राहून निःस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणारे सोनार समाज संघटना सोलापूर जिल्हा, सोलापूर चे अध्यक्ष श्री वसंत रामचंद्र पोतदार व दोन दशके सहभागी राहिलेले श्री विजयकुमार कृष्णाथ पोतदार यांचा समावेश असून त्यांना हा पुरस्कार घोषित झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येतं आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्था नासिक तर्फे करण्यात आले आहे.
