लग्नाच्या विचारात आहात मग यायला लागतंय सोलापूर ला
पांचाळ सोनार वधू वर मेळावा
सोलापूर/ प्रतिनिधी
सोलापूर ---पांचाळ सोनार समाज गौरव समिती तथा सोनार समाज संघटना व पांचाळ सोनार समाज संस्था सोलापूर यांचे संयुक्त विध्यमाने
निर्मिती लॉन्स, सैफुल चौक, विजापूर रोड सोलापूर येथे रविवार दिनांक 29 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते संध्या. 5 या वेळेत पांचाळ सोनार समाजातील विवाह ईच्छुक नवं वधू वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून हा मेळावा विना शुल्क, कोणतीही फी न घेता आयोजित करण्यात आली आहे.
पालकांची मागणी पी डी एफ फाईल ऐवजी वधू वर सूची असल्याने सूची मोफत देणे संस्थेला परवडणारे नाही तथापी सर्वाना परवडेल अशी नाम मात्र सेवा मूल्य रुपये 350 / इतकी ठेवण्यात आली आहे.
तरी नियोजित वधू वर त्यांच्या पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेने केले आहे. हल्ली पांचाळ सोनार च नव्हे तर इतर सर्वच समाजात मुला मुलींचे लग्न जमविणे जिकिरीचे होऊन बसले आहे. पूर्वी नात्यातून स्थळे येतं होती, आता ती पद्धत बऱ्याच अंशी बंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर अशा समाजाकडून आयोजित केलेल्या वधू वर मेळाव्याची चांगली मदत होत आहे. प्रत्येक वेळी वधू वर मेळाव्यास उपस्थित राहून लग्न जमविण्याचे प्रमाण ही वाढत आहे. मेळाव्यात थेट मुला मुलींना पाहण्याची संधी उपलब्ध होते. त्यात पसंती आल्यास पुढे जाऊन प्रत्येकाचे सोयरीक करण्यासाठी प्रयत्न केले जातात. परंतु प्राथमिक माहितीसाठी या मेळाव्याचा चांगला उपयोग होत असल्याचे समाजातील पालकांच्या प्रतिक्रिया आहेत.
तरी एक तास अगोदर मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून पांचाळ सोनार समाजातील जास्तीत जास्त विवाह इच्छुक प्रथम वधुवर, विधवा, विधुर, घटस्फोटीत, अपंग वधू वर यांनी आपला भावी जोडीदार निवडण्यासाठी पालकांसोबत उपस्थित राहावे. वधू वर यांनी मेळाव्यास येताना त्यांचे बायोडाटा व दोन आय साईझ रंगीत फोटो आणावे . एक फोटो नोंदणी फॉर्म वर चिकटवावा व एक फोटोच्या पाठीमागील बाजूस आपले नांव गांव लिहून नोंदणी फॉर्म सोबत जोडावा.मेळाव्यास उपस्थित राहणाऱ्या वधू वरांचाच बायोडाटा स्वीकारणेत येईल. मेळाव्या संदर्भात अधिक माहितीसाठी सर्वश्री मोहन मंद्रूपकर 94223 80712, संजयजी मैदर्गीकर 98226 68690, संतोष कळमणकर 98501 36061,निलेश धाराशिवकर 89836 77759, विजयकुमार पोतदार 90499 96946 यांचेसी संपर्क साधावा. असे अध्यक्ष वसंत पोतदार यांनी कळविले आहे.
