ज्येष्ठ नागरिकांच्या कॅरम स्पर्धा संपन्न
मुंबईः श्रमिक ज्येष्ठ नागरिक संघ ना. म. जोशी मार्ग परळ यांच्या रौप्य महोत्सवी वर्षात पुरुष व महिलांसाठीच्या ऐकेरी भव्य कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) मुंबई विभाग पुरस्कृत स्पर्धेत मुंबई व नवी मुंबईतील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. या स्पर्धेस मुंबई व महाराष्ट्र कॅरम संघटनेच्या पदाधिका-यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. स्पर्धा नियोजन दिलिप सांडगे यांनी उत्कृष्ठरित्या केले व त्यास श्रमिक जेष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बहुमोल साथ लाभली.पुरुष ऐकेरी स्पर्धेचे विजेतेपद मुलुंड जेष्ठ नागरिक संघाचे प्रविण खरात यांनी तर उपविजेतेपद श्रमिक जेष्ठ नागरिक संघाच्या दिलिप सांडगे यांनी पटकावले. महिला गटात श्रीमती जयमाला परब- बोरिवली जेष्ठ नागरिक संघ या विजेत्या तर श्रीमती स्वाती नवाथे मुलुंड जेष्ठ नागरिक संघ या उपविजेत्या ठरल्या.
पारितोषिक वितरण राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे खजिनदार श्री निवृत्ति देसाई – प्रमुख पाहुणे व सुरेश ईश्वर पोटे फेस्कॉम - मुंबई विभागाचे अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले. श्रमिक जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष गणेश पोशिरकर यांनी सर्व खेळाडू व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. एकूणच स्पर्धा व कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
