कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद
विजयपूर जिल्हा कार्यकारिणी जाहीर
विजयपूर / प्रतिनिधी
कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद कलबुरगीच्या विजयपूर जिल्हा शाखेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आलीअसून जिल्हाध्यक्ष दीपक शिंत्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पुढील प्रमाणे पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
विजयपूर जिल्हा करामसाप अध्यक्ष दीपक शिंत्रे, उपाध्यक्ष डॉ. सदाशिव पवार, कार्यवाह कन्हैया पेठकर सहकार्यवाह प्रा. गंगाधर गेंड, कोषाध्यक्ष म्हणून डॉ.सुधाकर शिंदे सी.ऐ. यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. कार्यकारिणी सदस्य म्हणून डॉ.एस.जे. जहागिरदार,श्रीपाद पाटणकर, सौ. रुपा हिबारे, प्रा. रेखा अध्यापक, प्रा. रेवती कट्टी, प्रा.उल्का जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचा डिसेंबरच्या अखेरीस होणाऱ्या एका खास समारंभात सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार असून या कार्यक्रमास करामसाप प्रमुख व अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे उपाध्यक्ष गुरय्या रे.स्वामी,कलबुरगी करामसाप कार्यवाह प्रभाकर सलगरे,कोषाध्यक्ष मिलिंद उमाळकर, नरसिंगराव मराठे सह विजयपूर जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
