पांचाळ सोनार गौरव समितीचे राज्यस्तरीय विज्ञानरत्न पुरस्कार जाहीर
सोलापूर -- पांचाळ सोनार गौरव समिती तथा सोनार समाज संघटना आणि पांचाल सोनार संस्था सोलापूर यांच्या वतीने सोनार समाजातील विज्ञान आणि तंत्र ज्ञानाधीन विविध क्षेत्रात वैयक्तिक रित्या केलेल्या उल्लेखनीय आणि प्रेरणादायी कार्य आणि सामाजिक योगदानाबद्दल खालील सुवर्ण रत्न अभियंत्याना राज्यस्तरीय विज्ञान रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.
सर्वश्री जितेंद्र रामचंद्र दीक्षित, अथर्व अमर दीक्षित, अथर्व अवधूत महामुनी, विनायक सूर्यकांत पंडित, कु. रुपाली रुद्रप्पा दोडमनी सर्व सोलापूर
रविवार 29 डिसेंबर रोजी सोलापूर शहरात होणाऱ्या राज्यस्तरीय वधू वर मेळाव्यात राज्यस्तरीय विज्ञान रत्न पुरस्कार प्रदान समाजातील अतिविशिष्ठ मान्यवरांच्या उपस्थित संपन्न होणार आहे.अशी माहिती श्री वसंत पोतदार यांनी दिली.
