Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

इचलकरंजीतून रात्रीच्या वेळी सांगली,कोल्हापूर , मिरज मार्गावर एसटीच्या फेऱ्या सुरु करा

Responsive Ad Here

 इचलकरंजीतून रात्रीच्या वेळी सांगली,कोल्हापूर , मिरज मार्गावर एसटीच्या फेऱ्या सुरु करा

भाजपाची मागणी 

 इचलकरंजी / प्रतिनिधी 

    इचलकरंजीतून रात्री दहानंतर कोल्हापूर व सागंली - मिरज मार्गावर एसटी बसेस फे-या होत्या. त्यामुळे नोकरदारांसह व्यापारी वर्गाची मोठी सोय होत होती. मात्र या मार्गावरील एसटी बसेसच्या फेऱ्या गेल्या कांही दिवसांपासून  बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे संबंधित प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे या मार्गावरील रात्रीच्या वेळी एसटी बसेसच्या फे-या पूर्ववत कराव्यात, अशी मागणी शहर भाजपच्यावतीने करण्यात आली.

शहराध्यक्ष अमृत भोसले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने इचलकरंजी आगार प्रमुख सागर पाटील यांना निवेदन देवून चर्चा केली. याबाबत आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. तर तातडीने याबाबत या मार्गावरील एसटी वाहतूक पूर्ववत करण्यासाठी कार्यवाही करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

इचलकरंजीतून कोल्हापूर व सांगली - मिरज मार्गावर रात्री उशिरापर्यंत एसटी बसेसची ये-जा सुरु असते. त्यामुळे कोल्हापूर, सांगली परिसरात असणारा नोकरदार वर्ग तसेच मिरज रेल्वेस्थानकात ये-जा करण्यासाठी व्यापारी वर्ग यांची नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे या प्रवाशी घटकांसाठी एसटी बसेसची सुविधा अत्यंत उपयुक्त होती. मात्र गेल्या कांही दिवसांपासून रात्रीनंतर इचलकरंजीतून या मार्गावरील एसटी बसेसच्या फे-या बंद केल्यांमुळे प्रवाशी नागरिकांना मोठी गैरसोय होत आहे. रात्रीच्या वेळी अन्य वाहनांचा कोणताही पर्याय नाही. त्यामुळे या मार्गावर पूर्वीप्रमाणे एसटी बसेसच्या फे-या सुरु कराव्यात, अशी मागणी निवेदनात केली आहे.

निवेदन देतेवेळी महिला शहराध्यक्ष अश्वीनी कुबडगे,  राजेश रजपूते, नागुताई लोंढे, योगीता दाभोळे, निता भोसले, कौशल्या गाडे दीपक पाटील, सचिन माळी,अभय बाबेल,  माधवी मुंडे, वर्षा कांबळे, उमा चव्हाण, उमा जाधव, वंदना शिंदे, संगीत घोरपडे, अलका विभुते, विद्या केसरे, प्रमोद पाटील, सागर कचरे, सिध्दलिंग बुक्का, अर्जुन सुतार, सचिन कोरे, अँड वैभव हावळे उमाकांत दाभोळे आदी कार्यकर्ते, प्रवासी उपस्थीत होते.

इचलकरंजी ः इचलकरंजीतून रात्री दहानंतर कोल्हापूर व सागंली - मिरज मार्गावर एसटी बसेस फे-या होत्या. त्यामुळे नोकरदारांसह व्यापारी वर्गाची मोठी सोय होत होती. मात्र या मार्गावरील एसटी बसेसच्या गेल्या कांही दिवसांपासून फे-या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे संबंधित नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे या मार्गावरील रात्रीच्या वेळी एसटी बसेसच्या फे-या पूर्ववत कराव्यात, अशी मागणी शहर भाजपच्यावतीने करण्यात आली.

शहराध्यक्ष अमृत भोसले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने इचलकरंजी आगार प्रमुख सागर पाटील यांना निवेदन देवून चर्चा केली. याबाबत आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. तर तातडीने याबाबत या मार्गावरील एसटी वाहतूक पूर्ववत करण्यासाठी कार्यवाही करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

इचलकरंजीतून कोल्हापूर व सांगली - मिरज मार्गावर रात्री उशिरापर्यंत एसटी बसेसची ये-जा सुरु असते. त्यामुळे कोल्हापूर, सांगली परिसरात असणारा नोकरदार वर्ग तसेच मिरज रेल्वेस्थानकात ये-जा करण्यासाठी व्यापारी वर्ग यांची नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे या प्रवाशी घटकांसाठी एसटी बसेसची सुविधा अत्यंत उपयुक्त होती. मात्र गेल्या कांही दिवसांपासून रात्रीनंतर इचलकरंजीतून या मार्गावरील एसटी बसेसच्या फे-या बंद केल्यांमुळे प्रवाशी नागरिकांना मोठी गैरसोय होत आहे. रात्रीच्या वेळी अन्य वाहनांचा कोणताही पर्याय नाही. त्यामुळे या मार्गावर पूर्वीप्रमाणे एसटी बसेसच्या फे-या सुरु कराव्यात, अशी मागणी निवेदनात केली आहे.

निवेदन देतेवेळी महिला शहराध्यक्ष अश्वीनी कुबडगे,  राजेश रजपूते, नागुताई लोंढे, योगीता दाभोळे, निता भोसले, कौशल्या गाडे दीपक पाटील, सचिन माळी,अभय बाबेल,  माधवी मुंडे, वर्षा कांबळे, उमा चव्हाण, उमा जाधव, वंदना शिंदे, हीहवीशीसंगीत घोरपडे, अलका विभुते, विद्या केसरे, प्रमोद पाटील, सागर कचरे, सिध्दलिंग बुक्का, अर्जुन सुतार, सचिन कोरे, अँड वैभव हावळे उमाकांत दाभोळे आदी कार्यकर्ते, प्रवासी उपस्थीत होते.