अक्षर कट्टा ज्येष्ठ नागरिक तर्फे संविधान दिन साजरा
मुंबई/ प्रतिनिधी
मुंबई- आज अक्षर कट्टा ग्रुप ज्येष्ठ नागरिकांनी संविधानाचे वाचन करून संविधानाच्या विचाराने चालण्याची शपथ घेतली या वेळेस फेस्कॉम मुंबईचे अध्यक्ष सुरेश पोटे यांनी भारतीय संविधानामुळे आज देश एकत्र असून सुरक्षित, मजबूत स्थितीत आहे व सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोंविदयाने राहत आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर समितीने संविधान बनविताना सर्व गोष्टींचा विचार करून संविधान बनवले असून त्या संविधानाचा आदर राखून वागले पाहिजे व ते आचरणात आणले पाहिजे.
