डीएचऒ कडून खाजगी रुग्णालयांची तपासणी
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
डीएचओ डॉ .बी.जी. हुबळी यांनी विजयपूर जिल्ह्यातील चडचाण शहरातील विविध खासगी रुग्णालये आणि नेत्र तपासणी दुकानांवर छापे टाकून तपासणी केली . त्यानंतर
प्रसारमाध्यमाशी बोलताना डीएचओ डॉ. बी.जी.हुबळी म्हणाले, जिल्ह्यातील इंडी, चडचाण व सिंदगी या भागांतील खाजगी रूग्णालयात भ्रूण हत्येचे प्रकरण घडले असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांत येत असल्याने आम्ही अचानकपणे तालुक्यातील विविध खाजगी रूग्णालयात जाऊन पाहणी करीत आहोत.
अशी कोणतीही रुग्णालये सापडलेली नाहीत. मात्र, नेत्र तपासणी केंद्र म्हणून नाव असलेल्या दुकानांमध्ये बेकायदा नेत्र तपासणी मशिन आढळून आल्याने अशा व्यक्तींना त्यांच्या नावाच्या पाट्या काढून टाकण्याची सूचना यापूर्वीच करण्यात आली आहे. हे काम असेच सुरू राहिल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आल्याचे माहिती देऊन त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

