विजेच्या धक्क्याने दोन मुलांचा मृत्यू
विजयपुर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
विजेचा धक्का लागून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना विजयपुर तालुक्यातील डाबेरी तलावात घडली. रोहित चव्हाण (8) आणि विजय चव्हाण (16) अशी मृत मुलांची नावे आहेत.
मासे पकडण्यासाठी तलावाकडे
ते गेले असता तलावात पडलेल्या विजेच्या खांबाची मुख्य तार मुलांना दिसली नाही.
तलावात मासेमारी करत असताना विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला. घटनास्थळी विजयपूर ग्रामीण पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. ही घटना विजयपूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
