Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

आंदेवाडी ( ज ) च्या उपसरपंच पदी ज्योती सिद्धाराम कलमनी यांची बिनविरोध निवड .

Responsive Ad Here


 आंदेवाडी ( ज ) च्या उपसरपंच पदी ज्योती सिद्धाराम कलमनी यांची बिनविरोध निवड .

              अक्कालकोट तालुक्यातील आंदेवाडी जहांगीर ग्रामपंचायत उपसरपंच पदाकरीता निवडणूक घेण्यात आली . यामध्ये शावर सिधेस्वर ग्रामविकास पॅनलकडून सौ ज्योती कलमनी यांची एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी श्रीकांत लाळगे यांनी जाहीर केले . उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याबदल चेअरमन अण्णाराव करवीर रुद्देवाडी यांच्या हस्ते पुष्पहार घालून पेढे भरवून सत्कार करण्यात आले .

        यावेळी बोलताना नुतन उपसरपंच ज्योती कलमनी बोलतांना म्हणाल्या की , माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे , अण्णाराव करवीर , शितलताई म्हेत्रे यांच्या नेतृत्वा खाली आंदेवाडीच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले .

            यावेळी सरपंच सौ जगदेवी धोडमनी , ग्रामसेवक कलमनी , सदस्य - रुकमोदिन नदाफ , संजय पुजारी , रियाना मुजावर , शिवम्मा जमादार यांच्यासह आंदेवाडी जा ग्रामस्त उपस्थित होते .