Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

दुधनीत श्री शांतलिंगेश्वर महास्वामीजींच्या ६८ व्या पुण्यतिथीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

Responsive Ad Here

 दुधनीत श्री शांतलिंगेश्वर महास्वामीजींच्या ६८ व्या पुण्यतिथीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन


११ व १२ ऑक्टोबर रोजी विरक्तमठात विविध धार्मिक कार्यक्रम; पालखी सोहळा, आध्यात्मिक प्रवचन, डोलिन गायन आणि दीपोत्सवाचे आकर्षण











दुधनी प्रतिनिधी : निंगप्पा निंबाळ


दुधनी येथील श्री शांतलिंगेश्वर विरक्तमठात लिं. श्री म.नि.प्र. गुरुशांतलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या ६८ व्या पुण्यतिथीनिमित्त रविवार, दि. ११ आणि सोमवार, दि. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात षटस्थल ध्वजारोहण, धर्मचिंतन, डोलिन गायन, गुरुवंदन, अड्डपल्लखी जंगमोत्सव, महागणाराधना, शिवानुभव गोष्टी आणि भव्य दीपोत्सव आदी कार्यक्रम होणार आहेत.


पहिल्या दिवशी ध्वजारोहण व डोलिन गायन


रविवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता परमपूज्य श्री म.नि.प्र. डॉ. शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या अमृतहस्ते षटस्थल ध्वजारोहण होणार आहे. रात्री ८ वाजता धर्मचिंतन गोष्टींचे आयोजन करण्यात आले असून, रात्री ९ वाजता प्रसिद्ध कलाकारांच्या सहभागातून डोलिन पदांचा विशेष जागरण कार्यक्रम रंगणार आहे.


या कार्यक्रमात हिरेबेवनूर (ता. इंडी, जि. विजापूर) येथील श्री बीरदेवर गायन संघ आणि कुरघाट (ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर) येथील श्री अमोघसिद्धेश्वर डोलिन गायन संघ सहभागी होणार आहेत. मुख्य गायक नसरीन कुरगोठ, साहित्य सरदार गुरुलिंग मास्टर संकनाळ आणि संवादासाठी सोमु मास्टर कोटनाळ यांचा सहभाग असणार आहे.


दुसऱ्या दिवशी पालखी सोहळा, महाप्रसाद व दीपोत्सव


सोमवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता परमपूज्य श्री म.नि.प्र. शिवबसवरेंद्र महास्वामीजी यांचे गुरुवंदन समर्पण होणार असून, भव्य वाद्यांच्या गजरात अड्डपल्लखी जंगमोत्सव अर्थात पालखी सोहळा पार पडणार आहे. सकाळी ११ वाजता महागणाराधना व महाप्रसाद वितरण होईल.


दुपारी २.३० वाजता ज्ञान दासोहाचे शिवानुभव गोष्टी अर्थात आध्यात्मिक प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी ७ वाजता भक्तिमय वातावरणात भव्य दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे.


भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन


श्री शांतलिंगेश्वर विरक्तमठाच्या वतीने दुधनी शहरासह परिसरातील सर्व भाविक भक्तांना सपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पवित्र पुण्यतिथी सोहळ्यात सहभागी होऊन धार्मिक कार्यक्रमांचा, आध्यात्मिक विचारांचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मठाच्या वतीने करण्यात आले आहे.