Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी

Responsive Ad Here



मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी


दिल्लीतील लाठीमाराच्या निषेधार्थ विजयपूरमध्ये विविध संघटनांचे आंदोलन

विजयपुर प्रतिनिधि - दिपक शिंत्रे 







 

 दिल्ली येथे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा निषेध करण्यासाठी विजयपूरमध्ये रविवारी विविध पुरोगामी संघटनांच्या संयुक्त मंचाच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली.

  यावेळी एसयूसीआय (कम्युनिस्ट) पक्षाचे जिल्हा सचिव भगवान रेड्डी यांनी केंद्र सरकारच्या गृह विभागावर लोकशाही मार्गाने होणारी आंदोलने दडपण्यासाठी सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप केला. शांततेत आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर लाठीमार करून त्यांना रस्त्यावर पाडणे व फरफटत नेणे, हे लोकशाही मूल्यांना बाधा आणणारे असल्याचे ते म्हणाले.


**ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटविण्याची मागणी**

 मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकप) जिल्हा सचिव भीमराय पुजारी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटविण्याची तसेच बेकायदेशीर असल्याचा आरोप होत असलेली मतदारयादीची विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली.

  ’ आंदोलन समितीचे समन्वयक अब्दुल खादर यांनी केंद्र सरकार संविधानाचा गैरवापर करून फॅसिस्ट धोरणे राबवत असल्याचा आरोप केला.

   या आंदोलनात महिला नेत्या सुरेखा राजपूत, अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या नेत्या सुनंदा नायक, लक्ष्मण हंद्राळ, सुरेश बिजापूर, सिद्धरामय्या हिरेमठ, फयाज कलादगी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

 मल्लिकार्जुन एच.टी., भरतकुमार एच.टी., बाळू जेवूर, सिद्धलिंग बागेवाडी, शिवबाळम्मा कोंडगुळी, शिवरंजिनी एस.बी., सुवर्णा हळगणी, सुमंगला आनंद शेट्टी, सुरेखा वाघमोरे, खाजासाब आणि बीरकब्बी साहुकार यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी आंदोलनात सहभागी झाले होते.