Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

सामाजिक कार्याची दखल; निंगप्पा निंबाळ यांचा सत्कार सिन्नूर येथे जगदीश्वरानंद महास्वामीजींच्या हस्ते गौरव

Responsive Ad Here

 सामाजिक कार्याची दखल; निंगप्पा निंबाळ यांचा सत्कार


सिन्नूर येथे जगदीश्वरानंद महास्वामीजींच्या हस्ते गौरव









दुधनी : प्रतिनिधी — 


सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रमांच्या माध्यमातून योगदान देत तसेच वंचित व पीडित घटकांच्या प्रश्नांना पत्रकारितेच्या माध्यमातून वाचा फोडणारे पत्रकार निंगप्पा श्रीमंत निंबाळ यांचा सिन्नूर येथे जगदीश्वरानंद महास्वामीजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


निंगप्पा निंबाळ हे गेल्या काही वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून, सामाजिक बांधिलकी जपत विविध सामाजिक व जनजागृतीपर उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत. सामान्य नागरिकांच्या समस्या, वंचित घटकांचे प्रश्न तसेच सामाजिक विषयांना आपल्या लेखणीच्या माध्यमातून व्यासपीठ मिळवून देण्याचे कार्य ते करीत आहेत.


पत्रकारितेबरोबरच सामाजिक क्षेत्रातही त्यांनी योगदान दिले असून, विविध महापुरुषांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन, सामाजिक जनजागृती आणि समाजात एकोपा निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची यावेळी दखल घेण्यात आली.


यावेळी जगदीश्वरानंद महास्वामीजींनी निंबाळ यांच्या सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. समाजातील दुर्बल घटकांसाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान हा समाजाला सकारात्मक दिशा देणारा असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले. यावेळी 

सतलिंगप्पा जेवार्गी राजू हौदे आणविरंय स्वामी सिद्दाराम जेवर्गी निंगप्पा हौदे प्रकाश कालसगोंड जगदीश उजनी चेन्नय स्वामी शरण अंतर्गगा जगू तोळानूर संगमेश सुतार रवी जेवर्गी भुताळी कालसगोंड सुभाष उजनी सिद्धराम सोनकांबळे शिवानंद सोनकांबळे चंद्रकांत कांबळे व आदी 

गावातील नागरिक मोट्या संख्येने उपस्थिती होते 

चौकट- 


सत्काराबद्दल निंगप्पा निंबाळ यांनी कृतज्ञता व्यक्त करत, “मिळालेला सन्मान ही माझ्यासाठी प्रेरणा असून, यापुढेही समाजातील वंचित आणि गरजू घटकांच्या प्रश्नांसाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा प्रयत्न करणार आहे,” अशी भावना व्यक्त केली.