Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

शिवानंद तगडूर यांच्याविरोधातील तक्रारीचा निषेध; बंगले मल्लिकार्जुन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Responsive Ad Here



 शिवानंद तगडूर यांच्याविरोधातील तक्रारीचा निषेध; बंगले मल्लिकार्जुन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी










विजयपूर / प्रतिनिधि -दिपक शिंत्रेे 

कर्नाटक कार्यरत पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष शिवानंद तगडूर यांच्याविरोधात स्वयंघोषित अध्यक्ष बंगले मल्लिकार्जुन यांच्या नेतृत्वाखाली ‘कर्नाटक कार्यरत पत्रकारर ध्वनी’ या नावाने तक्रार दाखल करण्यात आल्याचा निषेध करण्यात आला. तसेच बंगले मल्लिकार्जुन यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत कार्यरत पत्रकार संघाच्या जिल्हा शाखेने  जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

  यावेळी संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक यडहळ्ळी म्हणाले की, बंगले मल्लिकार्जुन यांनी एका शासकीय अधिकाऱ्याला धमकी दिल्याप्रकरणी बल्लारी येथील ब्रूस पेटे पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. सिरुगुप्पा येथेही पोलीस प्रकरण दाखल झाल्यानंतर त्यांनी गाव सोडल्याचा आरोप करण्यात आला. तसेच अलीकडेच शिवमोग्गा जिल्ह्यात घडलेल्या एका प्रकरणात त्यांनी सार्वजनिकरीत्या माफी मागून स्वतःची सुटका करून घेतल्याची बाब ताजी असल्याचे त्यांनी सांगितले.

  अशा पार्श्वभूमीच्या बंगले मल्लिकार्जुन यांनी निवडणूक प्रक्रियेतून निवडून आलेले राज्याध्यक्ष शिवानंद तगडूर यांच्याविरोधात निराधार तक्रार दाखल करणे निषेधार्ह आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अशोक यडहळ्ळी यांनी केली.

  संघाचे जिल्हा सरचिटणीस इंदुशेखर मणूर म्हणाले की, केयूडब्ल्यूजेने सरकारच्या अनेक कार्यक्रमांमध्ये सहकार्य केले असून, ही सरकारमान्य पत्रकारांची एकमेव संघटना आहे. संघटना आणि पत्रकारांच्या कल्याणासाठी प्रामाणिकपणे कार्यरत असलेले राज्याध्यक्ष शिवानंद तगडूर यांच्यावरील आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. त्यांची जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या बंगले मल्लिकार्जुन यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

  यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य प्रकाश बेण्णूर, जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत मेंडेगार, बसवराज उळ्ळागड्डी, समीर इनामदार, जिल्हा खजिनदार राहुल आपटे, जिल्हा सचिव सद्दाम जमादार, जिल्हा कार्यकारिणी सदस्य गुरु गद्दनकेरी, संजीव कुलकर्णी, गोपाळ कनिमणी, शंकर जळ्ळी, शिवानंद शिवशरण, सुरेश तेरदाळ, प्रभू कुमटगी तसेच पत्रकार षडक्षरी कंपूनवर, प्रदीप कुलकर्णी, सुनील गोडेन्नवर, चंद्रकांत मावूर, रवी जहागीरदार आदी उपस्थित होते.