Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

२१ वर्षे फरार असलेला जन्मठेपेचा आरोपी अटक

Responsive Ad Here

 


२१ वर्षे फरार असलेला जन्मठेपेचा आरोपी अटक









  विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

२१ वर्षांपूर्वी पॅरोल रजा घेऊन परत कारागृहात न हजर राहता फरार झालेल्या जन्मठेपेच्या आरोपीला विजयपूर पोलिसांनी अटक केली आहे.

   विजयपूर जिल्ह्यातील आलमेल पोलीस ठाण्यात २००२ साली नोंदवलेल्या खून प्रकरणात (IPC 302, 201) आरोपी आजान हुसेन मुजावर @ शेख याला २००३ मध्ये न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

   यानंतर २५ मार्च २००५ रोजी विजयपूर केंद्रीय कारागृहातून १० दिवसांची पॅरोल रजा घेऊन तो गावी गेला होता. मात्र, रजेचा कालावधी संपल्यानंतर तो पुन्हा कारागृहात परतला नाही आणि फरार झाला. यासंदर्भात महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील कमती पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला होता.

   या आरोपीच्या शोधासाठी विजयपूर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले होते. सायबर क्राईम पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर आरोपीला महाराष्ट्रातील इचलकरंजी येथे ११ एप्रिल रोजी ताब्यात घेतले.

   अटक केलेल्या आरोपीला न्यायालयात हजर करून पुन्हा केंद्रीय कारागृहात पाठविण्यात आले आहे. आरोपीचा शोध लावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले आहे.