Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

इंडी येथील केबीजेएनएलच्या कनिष्ठ अभियंत्याच्या घरी लोकायुक्तांची धाड; 4.60 कोटींपेक्षा अधिक बेहिशेबी मालमत्ता उघड

Responsive Ad Here



इंडी येथील केबीजेएनएलच्या कनिष्ठ अभियंत्याच्या घरी लोकायुक्तांची धाड; 4.60 कोटींपेक्षा अधिक बेहिशेबी मालमत्ता उघड







विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

 केबीजेएनएल (KBJNL) इंडी येथील कनिष्ठ अभियंता श्री प्रकाश ईरप्पा गोडबोळ यांनी ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा जास्त मालमत्ता जमवल्याच्या माहितीच्या आधारे  दि. 3 मार्च रोजी विजयपूर लोकायुक्त पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.


यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांच्या घरांची झडती घेण्यासाठी माननीय न्यायालयाकडून वॉरंट मिळवून आज सकाळी छापेमारी करण्यात आली. या कारवाईत आरोपीशी संबंधित बंगळुरू शहरातील महादेवपूर येथील विद्या हेरिटेज अपार्टमेंटमधील घर बिदर जिल्ह्यातील भाल्की तालुक्यातील वरवट्टी बी. गावातील घर, आरोपीशी संबंधित शाळा तसेच तो सध्या कार्यरत असलेले कार्यालय येथे झडती घेण्यात आली.

  झडतीदरम्यान आरोपीच्या बंगळुरू येथील घरात 4  वाहने सुमारे 21,97,500 रुपयांचे सोने-चांदीचे दागिने तसेच इतर मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे आढळून आली. प्राथमिक तपासात सुमारे  4.60 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीची अवैध मालमत्ता  जमा केल्याचे उघड झाले आहे.



ही कारवाई कर्नाटक लोकायुक्त, विजयपूरचे पोलीस अधीक्षक टी. मल्लेश यांच्या मार्गदर्शनाखाली डीएसपी मल्लिकार्जुन तुळसिगेरी यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

   या पथकात पोलीस निरीक्षक आनंद माई, टक्कनवर, आनंद डोणी, निंगप्प पूजारी, बाबासाहेब पाटील, मल्लिकार्जुन बिरादार तसेच कर्नाटक लोकायुक्त विजयपूर, बागलकोट आणि बिदर पोलीस ठाण्याचे कर्मचारी सहभागी होते. त्यांच्या संयुक्त कारवाईत ही झडती यशस्वीपणे पार पडली.