Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

दुधनी रेल्वे स्थानकाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत जी.एम. प्रतीक गोस्वामी यांना निवेदन; नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे यांचा पुढाकार

Responsive Ad Here

 दुधनी रेल्वे स्थानकाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत जी.एम. प्रतीक गोस्वामी यांना निवेदन; नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे यांचा पुढाकार






दुधनी / प्रतिनिधी 

येथील रेल्वे स्थानकावर आयोजित रेल्वे इन्स्पेक्शन (तपासणी) भेटी दरम्यान, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक (GM) प्रतीक गोस्वामी आणि मुख्य अभियंता (PCE) रजनीश माथुर यांची दुधनीचे नूतन नगराध्यक्ष श्री. प्रथमेशजी म्हेत्रे (मालक) यांनी भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

प्रमुख मागण्या:

नगराध्यक्ष म्हेत्रे यांनी दुधनीकरांच्या वतीने रेल्वे प्रशासनासमोर खालील महत्त्वाचे विषय मांडले:

दौंड-कलबुर्गी गाडी: या गाडीला तात्पुरत्या स्वरूपाऐवजी कायमस्वरूपी मान्यता देण्यात यावी.

कोल्हापूर-कलबुर्गी गाडी: या गाडीला दुधनी रेल्वे स्थानकावर अधिकृत थांबा मिळावा, जेणेकरून स्थानिक प्रवाशांची सोय होईल.

पुलाचे काम: दुधनी स्टेशनवर सध्या सुरू असलेले पुलाचे काम पावसाळा सुरू होण्यापूर्वी युद्धपातळीवर पूर्ण करावे, जेणेकरून नागरिकांची गैरसोय टाळता येईल.

उपस्थित मान्यवर:

या प्रसंगी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यात दुधनीचे नगरसेवक श्री. बसवराज होदे, गुरुशांत हबशी, हाजी नाकेदार, श्री. अप्पू माळगे, समीर जिडगे यांचा समावेश होता.

तसेच, श्री एस. जी. परमशेट्टी प्रशालेच्या वतीने शिक्षक श्री. सिद्धाराम नुला, श्री. गिरीश गाडी सर आणि गावातील मोठ्या संख्येने विद्यार्थी व नागरिक आपल्या मागण्यांचे समर्थन करण्यासाठी उपस्थित होते.

रेल्वे प्रशासनाने या मागण्यांवर सकारात्मक विचार करून तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली. महाव्यवस्थापकांनी या विषयांवर योग्य ते पाऊल उचलण्याचे आश्वासन दिले आहे.