मंत्री शिवानंद पाटील यांना मातृवियोग
विजयपूर प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
वस्त्रोद्योग, ऊस विकास, साखर तसेच कृषी बाजार मंत्री शिवानंद पाटील यांच्या मातोश्री गंगाबाई सिद्धरामप्पा पाटील (वय ८४) यांचे रविवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात महादेवी पाटील, शिवशरणगौडा पाटील, शिवानंद पाटील आणि विजुगौडा पाटील अशी अपत्ये तसेच नातवंडे व आप्तेष्ट परिवार असा मोठा परिवार आहे.
त्यांचा अंत्यसंस्कार रविवारी सायंकाळी ४ वाजता विजयपूर शहरातील जमखंडी रोडवरील शेतात करण्यात आले त्याप्रसंगी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर, विविध पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
